फोटो : तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी याना निवेदन देताना कोषाध्यक्ष श्रीपद धोकटे व मान्यवर
म्हसळा प्रतिनिधी
एखाद्या घटनेची तक्रार होते, त्यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते अशा घटनेत पोलीसांची भूमिका काय असे विचारले म्हणून घटनाक्रम व तपास गांभीर्याने करायचे सोडून विचारणा ऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्याचे काम म्हसळा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यानी केल्यामुळे संपुर्ण तालुक्यातील हिंदू समाजात पोलीसांबाबत नाराजीचा सूर उमटला आहे. या घटना क्रमात भविष्यात म्हसळा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर हेच तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतील या मतापर्यंत तालुका हिंदू संघटना पोहचली आहे , तसे निवेदन संघटनेच्या माध्यमांतून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी याना आज देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने संघटना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड यांची लौकरच भेट घेणार आहेत.
या बाबतचे सवीस्तर वृत्त असे की,म्हसळा शहरातील हिंदु समाजातील मुला-मुलीने कायद्याच्या चौकटीत राहून दिनांक २ नोव्हेंबर २०१९ रोजी विवाह केला,मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने त्या घटनेचा राग येवुन मुलीकडील नातलगांनी मुलगी आमच्यासाठी मृत पावली म्हणून तिचा फोटोसह श्रद्धांजलीचा फ्लेक्स लावला, ह्या निंदाजनक कृत्याला स्थानिक अन्य धर्मीय इसमाने मदत केल्याचे समजल्यावर म्हसळा तालुका 84 गाव हिंदु समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील व शहरातील अन्य कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जावुन त्यानी घटनेचे गांभीर्य पोलीस निरीक्षक खेडकर यांचे लक्षात आणुन दिले व सदर कृत्य करणारा इसम हा दोन धर्मात तेढ -तणाव निर्माण करीत असतो हे प्रकर्षाने व आभ्यासू पणे मांडले व त्याने केलेल्या घटना निदर्शनास आणून दिल्या, त्याचा आकस धरून म्हसळा पोलीसानी मुं.पो.अधिनियम ११० प्रमाणे कारवाईचे संकेत देऊन त्याना राष्ट्रद्रोही गुन्हेगारा प्रमाणे पोलीसांचा ताफा नेऊन तुम्हाला जिल्हा पोलीस अधिक्षकानी बोलावले आहे असे सांगत म्हसळ्यातून थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यालयात दि.५ नोव्हों. रोजी दाखल केले. ह्या सर्व घटनेचे प्रथम शुक्रवार दि. ६नोव्हें.च्या शांतता सभेत नागरीकानीच पोलीसांचा निषेध नोंदवित सभात्याग केला. व आज दिं ७नोहों. रोजी ८४गाव हिंदू संघटनेच्या कोषाध्यक्ष श्रीपद धोकटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटींगमध्ये हिंदू समाजाचे अध्यक्ष पाटील यांचे बाबतीत घडलेली ही बाब निंदनीय असल्याने म्हसळा हिंदु समाजाने पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांचे जाहीर निषेध नोंदविला व त्याबाबतचे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी याना देण्यात आले यावेळी हिंदु समाज कार्याध्यक्ष श्रीपत धोकटे, सचिव दिलीप कांबळे,म्हसळा शहर हिंदु समाज अध्यक्ष बाळासाहेब करडे, समीर बनकर,उप सभापती संदीप चाचले, अशोक काते, महेश पवार,भाऊ जैन,मधुकर गायकर, कांतीशेठ जैन , दुर्जनशेठ रजपूत,प्रकाश उर्फ बाबा करडे,किरण पालांडे,मुन्ना पानसरे, लक्ष्मण कांबळे,मधुकर पाटील,राजु लाड,संतोष सुर्वे, विशाल सायकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कोषाध्यक्ष श्रीपद धोकटे यांच्या अध्यक्षतेखाली श्री धावीर मंदीरात झालेली बैठक
Post a Comment