श्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी वाड्यांवर दिवाळी साजरी

श्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी वाड्यांवर दिवाळी साजरी

● सामाजिक उपक्रम कौतुकास्पद

● आदिवासी बांधवांनी मानले आभार

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 समाजातील सगळ्याच घटकातील वेगवेगळ्या सण-उत्सवांचा आनंद समान पद्धतीने साजरा करता यावा या उद्देशाने दिवाळी निमित्ताने श्री सोमजाई फाउंडेशन या सामाजिक संस्थे तर्फे आदिवासी वाड्यांवर जाऊन फराळ व कपडे वाटप करण्यात आले. फाउंडेशन मार्फत 225 कुटुंबियांना फराळ व 600 लोकांना कपडे वाटप करण्यात आले.  02 नोव्हेंबर रोजी म्हसळा व माणगाव तालुक्यात सोमजाई फाउंडेशनच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी हे कार्यक्रम सावर आदिवासी वाडी, चिखलप आदिवासी वाडी, साई आदिवासी वाडी आणि मांजरवणे आदिवासी वाडी या ठिकाणी जाऊन पार पाडले. तर प्रत्यक्ष आपल्या आदिवासी वाड्यांवर येऊन दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी केल्याने आदिवासी बांधवांनी सोमजाई फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष बबन चिले, जेष्ठ समाजसेवक बाबाजी रिकामे, विजय धुमाळ, अनंत रिकामे, लक्ष्मण महाडीक, जय खेडेकर, शांताराम पवार, यशवंत पवार, राम अंबिके, विनोद शिगवण, मनोज धुमाळ, नामदेव महाडीक, चंद्रकांत घोले, विशाल घाटवल, चंद्रवदन महाडीक, नागेश महाडीक, राजेंद्र महाडीक, उमेश घोले,मंगेश चिले,पांडुरंग महाडीक,कल्पेश महाडीक,भावेश महाडीक,राहुल महाडीक, पूजा घोले, भरत घोले, तेजस दर्गे, प्रणिता महाडीक, मनाली घोले, मानसी महाडीक, शुभम तटकरे, ओमकार घोले, विमल महाडीक, मनीषा महाडीक, प्रसाद चव्हाण, कल्पेश मुंडे, विरेन तायडे यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा