संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा बाजारपेठेत भाजीपाला विक्रेते किमान १५ ते २० असून , बाजारांत रोजची ८-१० टन भाजीची आवक होत असते अवेळी होणाऱ्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे, तर आवक होणाऱ्या भाज्याही दुय्यम प्रतिच्या आसल्याने लौकर सडतात, दुसरीकडे बाजारांतील ग्राहक हा शेतकरी, शेतमजुर आसल्याने बाजारांत प्रचंड मंदी आहे. भाजीपाला व्यापारी प्रंचड चिंतेत आहे.
म्हसळा बाजारांतील भाजी पाल्याचे आजचे भाव. कोथींबीर ३५-४०, कांदापात ३५-४०, पुदीना १०-१५, भेंडी ४०-५०, फ्लॉवर ४०-५०, गवार ५०-६०, फरसबी ६०-७०, कोबी ३०-ते ४०, गाजर ७०- ८०, बीट ५०-६०, सिमला मिरची ४०-५०, तूर ८०-१००, कारली ५०-६०, टॉमेटो ५०-६०, वांगी ५०-६०, कांदा रु ८०, बटाटा ३०, भूई शेंग ७०
अवेळी पावसामुळे पालेभाज्यांचे पीक हाती येण्यापूर्वीच खराब होत आहे. त्यामुळे दुय्यम प्रतवारीच्या पालेभाज्यांना बाजारात चांगले भाव मिळत आहेत. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पाले -भाज्यांची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तेजीत असल्याने किरकोळ बाजारात भाव चढेच रहाणार असल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात. म्हसळा शहरांत भाजीपाल्याची बहुतांश आवक पुणे मार्केट यार्ड मधून होत असते .
दिवाळीच्या आसपास पालेभाज्यांचे भाव उतरतात. पालेभाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात. एका जुडीचा भाव साधारपणे 10 ते 15 रुपयांपर्यंत राहतो. या वर्षी अवकाळी पावसाने पालेभाज्या कमी प्रतीच्या व महाग आहेत.
सुनंदा मानकाने , महीला . ग्राहक.
पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असाच राहिला, तर पालेभाज्यांचे मोठे नुकसान होईल. पालेभाज्यांची पुन्हा लागवड केल्यानंतर साधारणपणे महिनाभरात नवीन पीक हाती येईल. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पालेभाज्या तेजीत राहणार आहेत.
अशोक अडागळे,भाजीपाला विक्रेते
Post a Comment