अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता म्हसळ्यात शिवसेनेकडून मदत केंद्र सुरु

फोटो :अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता म्हसळ्यात शिवसेनेकडून मदत केंद्र सुरु : शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांचा हस्ते उद्घाटन

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

  नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या करिता मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांकडून आता मागणी केली जात आहे. अशा वेळी नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती मिळावी आणि ही माहिती शासन दरबारी मांडता यावी म्हणून शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची माहीती पिक कर्ज व इतर योजनांची माहिती नोंदवून घेतल्या जाणार आहेत. गुरुवारी या मदत केंद्राचे उदघाटन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख महादेव पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ करडे, माजी सभापती रवींद्र लाड, सरपंच राजाराम तीलटकर, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, बाळा म्हात्रे, अमोल पेंढारी, अनंत नाक्ती, अरुण चाळके, हेमंत नाक्ती आणी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा