म्हसळा वाचनालयात वाचक संवादाचे आयोजन


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सुजाण वाचक शिक्षक,विध्यार्थी यांच्या प्रती वाचन संस्कृती रुजविण्यासाठी,वाचकांना ग्रंथालयातील वाचन साहित्याची माहिती व्हावी त्या हेतूने मोकळ्या मनाने वाचकांशी संवाद साधावा या उद्देशाने म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात वाचन संवादाचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीने चर्चा करून संपन्न झाला.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मवर्षं शताब्दीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरवातीला माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संवाद कार्यक्रमात माजी ग्रंथपाल सुहासिनी दातार,आदर्श शिक्षक एम.ए.शेख,सी.एम.गांजरे, गट शिक्षण अधिकारी गजानन साळुंखे,किशोर मोहिते, डी.आर. सूर्यवंशी,श्रीमती रोहीणी पाटील, अमोल कोल्हे, संभाजी शिंदे, भावेश गाणेकर, विशाल पौळकर, संध्या देशपांडे, योगेश पाटील, रोहिणी पाटील, ग्रंथपाल उदय करडे, लिपीक धनश्री म्हात्रे, सायली चोगले, आदि मान्यवर वाचक उपस्थित होते.

वाचक व साहित्यिक यांनी म्हसळा सारख्या ग्रामीण भागात भव्यदिव्य वाचनालय आणि त्या मधील उपलब्ध ग्रंथ साठा,दैनंदिन वृत्तपत्र आदि सेवासुविधा बाबत मनोमन कौतुक केले.या वेळी वाचकांनी वाचन चळवळ सशक्त राबविण्यासाठी वाचकाना ग्रंथालयातील व्यवस्थापन,पुस्तक खरेदी, हाताळणी, तालुक्यातील खाजगी, जिल्हा परीषद शाळाना क्षेत्रीय भेट कार्यक्रमा अर्तगत क्षेत्रीय भेट कार्यक्रमात ग्रंथालय भेट व ग्रंथालयाचा कार्य पध्दती याबत माहीती करुन देणे असे उपक्रम राबविणे,वाचक वृद्धीसाठी थेट वाचकांचा सहभाग यामुळे वाचकांचे ग्रंथालयाजवळील संबंध आधिक बळकट झाले.यावेळी वाचनालयात स्वतंत्र अभ्यासिका सुरू करणे,स्पर्धा परिक्षांची पुस्तके वाचकाना घरी नेण्यास देणे अशा अभ्यासू मागण्या वाचकांकडून मांडण्यात आल्या.चर्चेत सहभागी झालेल्या व उपस्थित सर्व वाचकांना वाचनालयाची कार्यकारणी व कर्मचा-यांतर्फे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी आभार व धन्यवाद मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा