शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी दया ; शिवसेनेची मागणी

म्हसळा (बाबू शिर्के)
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची गरज आहे. तसंच १० हजार कोटींची जाहीर झालेली मदतही अत्यंत त्रोटक आहे.या शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेशाने म्हसळा तालुका शिवसेनेच्या वतीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये दया.त्वरित ओला दुष्काळ जाहीर करा, मच्छिमार बांधवाना मदत जाहीर करा अशा अनेक मागण्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, उपतालुका प्रमुख भाई कांबळे, राजाराम तीलटकर, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, अनंत नाक्ती, गणू बारे, बाळा म्हात्रे, अमित महामुनकर, रमेश खोत, आणी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा