राजिप केलटे शाळेत मुलांचे हक्क व बालसुरक्षा सप्ताह साजरा

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुलांचे हक्क व बालसुरक्षा सप्ताह दि.14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यत साजरा करायचा होता. या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील नेवरूळ केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा केलटे येथे मुलांचे हक्क व बालासुरक्षा सप्ताह साजरा करून बालदिनाचे महत्व विशद करण्यात आले.
तसेच केलटे शाळेत सप्ताह साजरा करताना विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबविताना "कला माझ्या आवडीची" उपक्रमात कोलाजकाम, मातीकाम, पर्ण डिझाईन, कडधान्य, पाने, खडे इत्यादी वस्तूंचा वापर करून रांगोळीचे विविधप्रकार साकारले व या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात रममाण होऊन सप्ताहाचा मनमुराद आनंद घेतला. 20 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
शाळेत स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक दत्ता जाधव, शिक्षिका चारुशीला पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. या उपक्रमाचे तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद बोर्ले आणि पालक वर्गाने कौतुक करून अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा