राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कणघर शाळेचे यश


सुहास मंगेश वाघमारे याने स्पर्धेत केले उत्कृष्ट प्रदर्शन 

म्हसळा प्रतिनिधी 
पुणे येथील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कणघर शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन करून जिल्ह्यासह तालुक्याचे आणि पर्यायाने कणघर शाळेचे नाव उज्वल केले आहे .  कणघर शाळेतील इयत्ता तिसरीमधील आदिवासी विद्यार्थी सुहास मंगेश वाघमारे याने या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले . कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागास व्यायाम देणारा क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारची ओळख आहे . या क्रीडा प्रकारची जपवणूक राजिप शाळा , कणघरचे विद्यार्थी गेले कित्येक वर्षे करत आहे . सुहासच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे . तरीदेखील त्याने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन हे यश मिळवले . शाळेतील मल्लखांब प्रशिक्षणासाठीच्या अपुऱ्या साधन सामुग्रीमध्ये सुहासने मिळवलेले यश कौतुकास पात्र असल्याचे मत मुख्याध्यापक अवधूत पवार यांनी व्यक्त केले . सुहासला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यासाठी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सरपंच धोकटे , माजी पं . स . सभापती उज्ज्वला सावंत , उपसरपंच धनंजय सावंत , शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष यशवंत सुर्वे , उपाध्यक्षा श्वेता इप्ते , सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यस्थापन समिती सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र सावंत , समाजसेवक संतोष ( नाना ) सावंत , रमेश सावंत , रामकृष्ण सावंत , कृष्णा मोरे , सुरेश पातेरे , अनिश शिगवण , सुनील भोसले , किसन जंगम , शुभांगी गुजर , प्रगती धोकटे , नरेश भुवड , सुरेश वाघरे , शंकर वाघरे ( पोलीस पाटील ) यांची विशेष मदत झाली . या यशाबद्दल गटविकास अधिकारी वाय . एम . प्रभे , गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे , केंद्रप्रमुख अनिल ठाकूर , मुख्याध्यापक अवधूत पवार , सूरज भऊड , पवन नारायण आडवळे यांनी सुहास वाघमारे याचे अभिनंदन केले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा