राजिप शाळा मेंदडी तर्फे प्लास्टिक जनजागृती



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

          शासनाच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परीषद शाळा मेंदडी येथे दि.02 आँक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर आधारित मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याविषयी शाळेतील शिक्षिका सायली बीर्जे व मयुरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छतेची व तंबाखुमुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली आणि गावात स्वच्छता जनजागृती प्रभातफेरी शाळेमार्फत आयोजित करून यामध्ये प्लास्टिक हटाव - जीवन बचाव, स्वप्न आपणा सर्वांचे - प्लास्टिक मुक्त भारताचे, गाव सारा स्वच्छ करु - प्लास्टिक पिशवी हद्दपार करू, हम सबका एकही नारा - प्लास्टिक हटाना लक्ष हमारा, कापडी पिशवी वापरा- पर्यावरण वाचवा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच आजूबाजूला पसरलेले प्लास्टिक कागद, पिशव्या, बाटल्या, व अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आले.
 तंबाखुमुक्ती बाबत मार्गदर्शन करताना अब्बास शेख सरांनी आपल्या घरातील माणसे तंबाखू तसेच तंबाखू पासून तयार होणारे मशेरी, गुटखा, मावा व अन्य पदार्थांचे सेवन करतात व कँन्सर सारख्या आजाराचे बळी ठरतात. तंबाखू मध्ये असणारे  निकोटिन सारख्या घातक पदार्थांचे दुष्परिणामांची माहिती देऊन प्रत्येकाने आपले कुटुंब तंबाखुमुक्त बनवा असे आव्हान केले.
 मुख्याध्यापक किशोर मोहिते यांनी प्लास्टिक बंदी बाबत माहिती देताना सांगितले की आपले घर, आवार, परीसर व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसते हेच हवेत उडून सगळीकडे पसरते व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच हेच प्लास्टिक गावातील गुरे खातात यामुळे त्यांच्या आतड्यांना पिळ पडून पचनक्रिया बिघडते त्यामुळे अनेक गुरे दगावतात असे सांगितले. त्याचबरोबर प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणामांचा विचार करून केंद्र व राज्य शासनाने बंदी घालणेबाबत जनजागृती करणेचे आदेश दिले आहेत. तरी सर्व घटकांनी गावातील प्लास्टिक कचरा याबाबत जागृती करावी व गाव प्रदूषण मुक्त करावे असे सांगितले
        यावेळी गीतांजली भाटकर, सायली बीर्जे, मयुरी पाटील, प्रियंका गोसावी, अब्बास शेख, उर्दू शाळेतील शबाना जालगावकर, अमीना सोलकर, तसेच अंगणवाडी सेविका उर्मिला कांबळे, मदतनीस सुचिता कांबळे, विजयश्री कांबळे, रुपाली पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच यावेळी राजिप शाळा मेंदडी मराठी व उर्दू चे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा