पोषण महीन्यात यंत्रणेची होणार सत्व परिक्षा : म्हसळ्यात सॅम - मॅमची अद्यापही २७ बालके


पोषण महीन्यात यंत्रणेची होणार सत्व परिक्षा : म्हसळ्यात सॅम - मॅमची अद्यापही २७ बालके
पोषण आभियानात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती 
संजय खांबेटे : म्हसळा - प्रतिनिधी 
कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या पोषण अभियान या महत्वाकांक्षी कार्यक्रमांत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जन जागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. कार्यक्रमाच्या दैनंदिन नोंदी पोषण अभियानाच्या डॅशबोर्डवर घालणे बंधनकारक आहे. तरी सॅम मॅमची मुले कमी होत नाही.
जिल्ह्यात कुपोषण मुक्‍तीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही म्हसळा तालुक्यात सध्यस्थितीत ११८ अंगणवाडयांतून. कमी वजनाची (मॅम) २६ बालके तर तीव्र कमी वजनाची (सॅम) १ बालक अशी मिळून एकूण २७ एवढी बालके अद्यापही सर्वसाधारण श्रेणीमध्ये येत नाहीत. कुपोषणाच्या विळख्यात अडकली असल्याचे उघड झाली आहे.
पोषण अभियानात सर्व अंगणवाडी कार्यकर्तीमार्फत मोबाईलचे माध्यमातून कॅस अॅप्लीकेशन अंर्तगत सर्व रेकॉर्ड, दैनंदिन नोंदी, वजन उंची आहार वाटप नोंदी ऑन लाईन होत आहेत, सर्व कार्यकर्ती पर्यवेक्षकाना पर्यवेक्षण वेळेवर होणे, सुपोषण दिवस , सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य , गरोदर माता नोंदणी , ग्राम आरोग्य व पोषण दिवस हे कार्यक्रम नियमीत करण्याचे आहे.

अभियानाचा उद्देशात जनजागृती वर भर आहे .
राज्यांत २०२२ पर्यंत कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे, या सर्वावर एकत्रित लक्ष प्राप्तीसाठी ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या एकत्रित अभिसरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. बालके, किशोरी, गरोदर व स्तनदा मातांचे पोषण व आरोग्या बाबत जन जागृती होणे महत्वाचे आहे.

अंगणवाड्यांत बालकांना शिक्षणाबरोबरच आहारही दिला जातो. तसेच बालकांची वजने घेऊन बालक कुपोषणाच्या कोणत्या पातळीत आहे, याची माहिती सतत ऑन लाईन नोंदली जाते,वयाच्या प्रमाणात उंची आणि वजन नसणाऱ्या बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येत असते,अंगणवाड्यात वॉटर फिल्टर बसवले जातात. एकात्मीक बालविकास केंद्राचे अधिकारी यांच्या कार्याची पारदर्शकता , यंत्रणा व फिल्टर सुस्थितीत असल्याची वरीष्ठ आधिकाऱ्यानी खात्री करावी.
एका बालकाचा पालक, म्हसळा तालुका

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा