अदीती तटकरे यानी घेतले पद्मश्रीआप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शुभाशिर्वाद


श्रीवर्धन विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जि.प. च्या अध्यक्षा अदीती तटकरे यानी घेतले पद्मश्रीआप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शुभाशिर्वाद

संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
श्रीवर्धन विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जि.प. च्या अध्यक्षा अदीती तटकरे यानी समाजात आपले अनन्य साधारण कार्याचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच आदरणीय श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांचे त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.कोणतेही विधायक कार्य यशस्वी करण्यासाठी, पुर्णत्वास नेण्यासाठी आपण देवाला नमन करुन आशिर्वाद घेत असतो. त्याचप्रमाणे समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाने, उल्लेखनीय कार्याने यशस्वी ठरलेल्या थोरा मोठ्यांचे शुभाशिर्वाद लाभले तर यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळुन काम सिद्धीस जाईल याच प्रेरणेने श्रीवर्धन विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जि.प. च्या अध्यक्षा अदीती तटकरे यानी घेतले पद्मश्रीआप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शुभाशिर्वाद अशा भावना व मत उपस्थित दास मंडळीनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा