वसंतराव नाईक महाविद्यालयात एकात्म मानववादाचे पुरस्कर्ते पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी


म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात एकात्म मानववादाचे पुरस्कर्ते  पंडित दिन दयाळ उपाध्याय  यांची जयंती साजरी
म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा येथील बँरिस्टरए.आर.अंतुले साहेब  यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला ,वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात  सांस्कृतिक विभागातर्फे पंडित दिन दयाळ उपाध्याय  यांची जयंती साजरी करण्यात आली  या  कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच श्रीराम नवरात्रोत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.समीरजी कमलाकर करडे  आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते  कार्यक्रमाच्या अध्ययक्षस्थानी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक श्री. एम.एस.जाधव सर  होते कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रा.एम.एस.जाधव यांनी पडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व  विशेष उपस्थिती असलेले मा.श्री.समीरजी कमलाकर  करडे आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांनी पुष्पाजंली अर्पण करून पंडीत दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस वंदन केले या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात दिन दयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा परीचय करून देताना त्यांनी " लिहलेल्या दो योजनाये" , "राजनीतिक डायरी" ,"भारतीय अर्थनीती का अवमूल्यन" आणि "एकात्म मानववाद " या पुस्तकाचा परीचय करून दिला  तसेच केंद्रशासनाने  दिन दयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती दिली त्यामध्ये  युवकांच्या रोजगार निर्मिती साठी सुरु करण्यात आलेली दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना , ग्रामीण भागातील १०० % विद्युतीकरण आणि अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेली दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच दिन  दयाळ उपाध्याय अंत्योदय योजना बाबत माहीती दिली त्यानंतर आभारप्रदर्शन होऊन प्राचार्यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा