बाल विकासअधिकारी राजन सांबरे यांचा महाराष्ट्र चित्रपट महासंघातर्फे " स्टार महाराष्ट्राचे " या पुरस्काराने सन्मान


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
रायगड जिल्हयात श्रीवर्धन येथे बालविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजन सांबरे यांचा महाराष्ट्र चित्रपट महासंघातर्फे " स्टार महाराष्ट्राचे " या पुरस्काराने अध्यक्ष जनार्दन शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व रोख रक्कम देऊन नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील बेलेझा बँक्वेट हॉलमध्ये सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला साई सागर एन्टरटेनमेंट नवी मुंबई हे सहप्रायोजक होते महाराष्ट्र चित्रपट महासंघ हा दरवर्षी क्रिडा, साहित्य, कला,समाजसेवा,प्रशासन अन्य क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींची विविध माध्यमां द्वारे पारदर्शक माहीती घेऊन सन्मान करतो . राजन सांबरे हे मूळचे पालघर जिल्हातील विक्रमगडचे ,वडील सरकारी सेवेत आसल्याने सांबरे यानाही लहानपणापासून वडलांसोबत बदलीच्या गावी जायची सवय झाली,आता एकात्मिक बालविकास अधिकारी म्हणून काम करताना पनवेल, कर्जत, खालापूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातून सेवा करताना ज्या तालुक्यात बदली ती गावे आपली हे धोरण त्यानी अवलंबले त्यामुळे त्यानाही समाजाकडून अपुलकी मिळाली . आधिकारी म्हणून अंगणवाडीला भेट म्हणजे प्रथम बालकांजवळ छोटया मोठया गोष्टी, निसर्ग, स्वच्छता या विषयी गाणी मग पुढील तपासणी असे त्यांचे साधे- सोपे व सरळ धोरण त्यामुळे ते कर्मचाऱ्यांत सुध्दा तेवढेच प्रिय. सांबरे यांच्या सन्मानाने त्यांचे पालघर , रायगड जिल्हयांत सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा