सही पोषण,देश रोशन करण्यासाठी म्हसळा तालुका सज्ज

सही पोषण,देश रोशन करण्यासाठी म्हसळा तालुका सज्ज : बाल विकास प्रकल्प कार्यालयात पोषण महिना अभियानाला सुरुवात
(म्हसळा प्रतिनिधी)
सही पोषण देश रोशन’, प्रत्येक घर पोषण उत्सव या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव अशा पोषण महिना अभियानाची आज महिला व बाल कल्याण, आरोग्य व ग्रामपंचायत विभाग रायगड जिल्हा परिषदेतर्फे म्हसळा बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे मार्फत पोषण महिना अभियान २o१९कार्यक्रमाला म्हसळा पंचायत समिती च्या सभापती छाया म्हात्रे यांचे शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे माजी उप सभापती मधुकर गायकर,अशोक काते,जेष्ठ पत्रकार उदय कळस, पर्यवेक्षिका रेणुका पाटील,वैष्णवी कळबासकर,दिपाली पालवे,तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठया संख्येने उपस्थित होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

बालकांमधील कुपोषण, खुजेपणा कमी करण्याबरोबरच किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करण्याच्या उद्देशाने पालकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम राज्यात राबवली जाणार आहे.त्यासाठी येत्या १ ते ३० सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण महिना' उपक्रम राबविणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडेयांनी दिली राज्यातील प्रत्येक जिल्हा- तालुक्यात गाव-वाडीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आसल्याचे तरवडे यानी सांगितले.शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, शौचालयाच्या वापराबाबत तसेच साबणाने हात धुण्याबाबत बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना सवय लावणे, ग्रामस्तरावर बेटी-बेटा सांख्यिकी आकडेवारी दर्शविणारा फलक लावणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकीचे आयोजन, महिला ई-शक्ती कार्यक्रम, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, महिला बचतगट, एनजीओ आदींचा सहभाग घेणे, सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता सुलभ करणे, महिलांसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देणे, चांगल्या आरोग्यदायी सवयींबाबत लोकजागृती साठी गृहभेटी करणे, किशोरवयीन मुलींकरीता जनजागृती शिबीर आदी उपक्रम राबविण्यात येणार आसल्याचे यावेळी सांगण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा