रायगड जिल्हा योगासन स्पर्धा व निवड चाचणी २०१९



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट संलग्न:महाराष्ट्र योग  असोसिएशन ,योग फेडरेशन ऑफ इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व  निवड चाचणी २०१९, रविवार दि.  04-09-2019रोजी सकाळी 9.०० वाजता घेण्यात येणार आहे.

सदर योगासन स्पर्धा खालील गटात होतील - 
८ ते १० वर्षे,   १० ते १२ वर्षे,   १२ ते १४ वर्षे,   १४ ते १६ वर्षे,  १६ ते १८ वर्षे,  १८ ते २१ वर्षे, २१ ते २५ वर्षे,  २५ ते ३० वर्षे, ३० ते ३५ वर्षे,  ३५ ते ४५ वर्षे आणि ४५ वर्षावरील पुरुष व महिला

स्पर्धेची वेळ :- 
नाव नोंदणी :- सकाळी. 8.00 वाजता 
स्पर्धा :- सकाळी ठीक. 9.00 वा. सुरु होईल

स्पर्धेचे ठिकाण :-  काडसिद्धेश्वर मठ, मु पो खरसई, ता. म्हसळा, जि. रायगड

स्पर्धेसाठी पोशाख :- 
मुले व पुरुष :- हाफ पॅंट
मुली व महिला :- योगा काॅश्च्यूम किंवा स्लॅक्स आणि टि-शर्ट
     
स्पर्धेसंबंधी माहिती :- 
१) प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या वयोगटाच्या योगासन अभ्यासक्रमातील लाॅटरी पद्धतीने काढलेली ५ आसने करावयाची आहेत.
२) प्रत्येक स्पर्धकाने आसनाच्या अंतिम स्थितीत ३० सेकंद स्थिर राहणे आवश्यक आहे.
3) प्रथम, द्वितीय आणि तृतीय व उत्तेजनर्थ क्रमांकाच्या स्पर्धकांना  प्राविण्य प्रमाणपत्र  देण्यात येईल 
5) क्रमांक 1 ते 3 चे विजयी स्पर्धक स्पर्धक  ३८ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.

स्पर्धकांनी सोबत ठेवावे :-
१) ४ पासपोर्ट आकाराचे फोटो
२)  शाळेचे बोनाफाइड
३) आधार कार्ड झेरॉक्स

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री हेमंत पयेर 9860601736

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा