स्वराज्य प्रतिष्ठानचा ६ वा वर्धापन दिन म्हसळयात



संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
संपूर्ण रायगड जिल्हयात सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रिडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानचा ६ वा वर्धापन दिन म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालयाचे हॉल मध्ये बुधवार दिं .४ सप्टेंबर रोजी सकाळी १०वा.३० वाजता संस्थापक अध्यक्ष भास्कर नारायण कारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे." छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण " या विषयावर प्रा.रोशन पाटील यांचे व्याख्यान होणार आस ल्याचे म्हसळा तालुका अघ्यक्ष निकेश भेकरे यानी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष भास्कर कारे हे सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रिडा या क्षेत्रांत निस्वार्थी काम करत असल्याने जिल्ह्यांतील युवक वर्ग संस्थेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षीत झाला आहे. त्यामुळे स्वराज्य प्रतिष्ठानच्या म्हसळयातील वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे भेकरे यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा