म्हसळा तालुक्यात दिड दिवसाचे ९९३ गणरायांचे विसर्जन : धुँवाधार पावसाने गणेश विसर्जन झाले वाहनाने
( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरासह तालुक्यांतील ८० गावातून आज सुमारे ९९३ गणरायांचे विसर्जन करण्यात आले.तालुक्यात खाडी, नदी, विहीर व तलावांत विसर्जन करण्याची प्रथा आहे.चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू असतो, भक्तगण आपल्या आवडीनुसार दीड, तीन, पाच व गौरी विसर्जनासोबत गणपती विसर्जनाची प्रथा आहे. छोटी कुटुंबे, वाढती महागाई , सुट्टी कमी असणे यामुळे दीड दिवसानी विसर्जन करण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे.
"संपूर्ण तालुक्यात आज मोठया प्रमाणात व धुँवाधार पाऊस असल्याने डोक्यावरून तुरळक गणेश विसर्जन तर बहुतांश गणेश विसर्जनाची वाहतुक खाजगी वाहनाने करण्यात आली. तालुक्यांतील नद्या जोरदार वहात असल्याने गणेशभक्तानी नदीच्या तीरावर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले."



Post a Comment