संजय खांबेटे :म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरांत विविध समाज एकत्रित असतात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम उत्कृष्ट पध्दतीने साजरे करीत असतात. या परंपरे नुसार ब्राह्मण समाजातर्फ भाद्रपद शु. ४ रोजी रात्रौ ९ वा. राधाकृष्णाच्या देवळामध्ये आरती व मंत्रपुष्पांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी . म्हसळा ब्राह्मण सभा अध्यक्ष भास्कर जोशी, दादा फाटक , विश्वास उर्फ मण्या भाऊ जोशी,डॉ. सुभाष ओक, राजानंद फाटक,वसंतराव जोशी, हर्षद फाटक, अॅड. स्वानंद दातार, सुमंत फाटक, मंदार दातार, महेंद्र जोशी, अतुल जोशी, सुनील दातार, प्रतिक ओक, सुहास उर्फ गुण्या दातार, केदार जोशी, सुचेंद्र फाटक आदी उपस्थित होते. यावेळी गणेश चतुर्थी निमित्त आरती ब मंत्र पुष्पांजलीची श्रेय व मान ब्राह्मण समाजाकडे असते .मंत्रपुष्पांजली ही वेदोक्त (वेदांमधील) आहे. वेदोक्त मंत्रांना स्वर असतात. त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून नीट शिकून, त्याचा चांगला सराव करून मगच म्हणावेत. वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणाऱ्याना त्रास होऊ शकतो. असे मान्यवरानी सांगितले.
मंत्र पुष्पांजलीचा अर्थ पुढील प्रमाणे
"देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात) प्रमुख धर्म, साधनामार्ग होता. जेथे पुरातन, अनादि असे उपास्यदेव आहेत असे देवलोक, साधना करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात. (यज्ञातील हविर्द्रव्ये ज्या देवतांप्रीत्यर्थ यज्ञ केला जात असे, त्या देवतांना पोहोचून त्या तृप्त होत असत व यज्ञ करणार्यांना इष्टफलाची प्राप्ती होत असे.)
राजाधिराज, सर्वशक्तिमान् अशा वैश्रवण (ज्ञानी, ज्याने ज्ञान उत्तम प्रकारे श्रवण केले आहे अशा) कुबेराला आम्ही नमन करतो. तो सर्व कामना पूर्ण करणारा वैश्रवण कुबेर (ज्ञानी व सर्व संपत्तीचा स्वामी कुबेर), कामनांनी युक्त असलेल्या माझ्या सर्व कामना पूर्ण करो. महाराज वैश्रवण कुबेराला नमस्कार असो. आमचे कल्याण असो. आमची ऐहिक व पारमार्थिक उन्नती होवो. (कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे. हा ब्रह्मदेवांचा पुत्र पुलस्त्य याचा मुलगा. त्याला ब्रह्मदेवानी अमरत्व दिले, तसेच धनाचा अधिपती व लोकपाल केले. त्याला शंकराशी सख्यत्व व यक्षांचे आधिपत्य आणि राजाधिराजपद दिले.)
सर्वसामर्थ्यवान्, चक्रवर्ती राजा असलेले आमचे हे राज्य एकछत्री, सर्व ऐश्वर्याने युक्त, मोक्षप्रद, साधनेला पोषक, सिद्धीप्राप्त, सर्वश्रेष्ठ, सर्व विश्वाचे अधिपतीत्व असलेले महान, विशाल राज्य, विश्वाच्या अन्तापर्यंत, परार्ध (ब्रह्मदेवाची राहिलेली ५० वर्षे) संपेपर्यंत चिरकाल नांदो. आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो.
त्यानंतर या श्लोकाने आविक्षित मरुत्त या राजाचे स्मरण केले आहे. या राजाविषयी असे म्हटले आहे की, आविक्षित या थोर राजाच्या मुलाला त्याच्या जातकर्माच्या वेळी तुंबरूंनी आशीर्वाद दिला होता की, ‘तो चक्रवर्ती राजा होईल. इंद्र व लोकपाल त्याचे कल्याण करतील. दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांकडील मरुत् त्याला अनुक्रमे स्वास्थ्य, पराक्रम व बल देतील.’ पुरोहिताने ‘मरुत् तव’ असा उल्लेख केल्याने व आविक्षिताचा मुलगा म्हणून तो आविक्षित मरुत्त या नावाने प्रसिद्ध झाला. हा इंद्राच्या बरोबरीचा व अतिशय वीर्यवान होता. समुद्रवलयांकित पृथ्वी त्याच्यावर अनुरक्त होती. महाराज आविक्षित मरुत्ताने काम, क्रोध व लोभ जिंकून धर्माने सार्या पृथ्वीचे पालन केले. याच्यासारखा राजा झाला नाही व पुढे होणार नाही."
महेश हरीभाऊ जोशी, जेष्ठ पंचांग अभ्यासक व पुरोहीत.
म्हसळा.

Post a Comment