श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
तालुक्यातील बोडणी घाटातील अपघाताची मालिका निरंतर चालू आहे .मुबंई हुन गणेश उत्सवासाठी गावी येत असलेल्या गणेश भक्तांची गाडी जोरदार पाऊस व वळण रस्ता याचा चालकाला अंदाज न आल्याने मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरली आहे .डाव्या बाजूला असलेल्या झाडी मुळे बस अडकली अन्यथा प्राणांतिक अपघाताचा प्रसंग आला होता .नशीब बलवत्तर त्यामुळे बस मध्ये प्रवास करणारे 15 प्रवाशी वाचले .
सीताराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची M H 04 .G P.3231 ही बस कांदिवली ते कारविणे येत असताना रविवारी सकाळी बोडणी घाटात अपघात ग्रस्त झाली .सकाळी जोरदार पाऊस व धुके होते .वडघर ते बोडणी अंदाजे 6 किमी तीव्र उतार आहे .नवीन चालकांना वळण रस्त्याचा व तीव्र उताराचा अंदाज न आल्याने सदरचा अपघात झाल्याचे समजते .बोडणी घाटातील वरच्या वळण रस्त्यावर सदरचा अपघात झाला आहे . अपघातात कोणतीही जीवित हनी झालेली नाही .बोडणी घाटात सर्व ठिकाणी रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या वाहन चालकास त्रासदायक ठरत आहेत .गणेशोत्सवा पूर्वी अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या बोडणी घाटातील झाडांच्या फांद्यां व वळण रस्त्या विषयी अपेक्षित खबरदारी सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली नाही .सदर अपघात विषयी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही .
सकाळी पाऊस व धुके होते त्यामुळे चालकाला वळण रस्ता समजला नाही .त्यामुळे बस रस्त्याच्या उजव्या बाजूला घसरली .बस मधील प्रवाशाला दुखापत झालेली नाही ....सननेश जोशी ( बस मधील प्रवाशी )

Post a Comment