श्रीवर्धन महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन ; शेतकरी व सर्वसामान्यांना त्रास


श्रीवर्धन महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन  ; शेतकरी व सर्वसामान्य लोकांना त्रास  : पंतप्रधान किसान मानधन योजनेवर परिणाम 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 
श्रीवर्धन तहसिल मधील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले त्याचा परिणाम महसूल विभागाशी निगडित कामावर झाल्याचे निदर्शनास आले .महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्याचे निवेदन श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी  याच्या कडे सादर केले आहे .सदरच्या निवेदनात 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी .विभाग अंतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात यावे  .प्रत्येक  तालुक्यात खनिकर्म निरीक्षक हे कारकून दर्जाचे पद निर्माण करण्यात यावे .तसेच कॅशलेस वैदयकिय सुविधा योजना राबविण्यात यावी .अस्थायी स्वरूपाची पदे स्थायी करण्यात यावीत .महसूल विभागाशी निगडित कामां नुसार पदांची निर्मिती करण्यात यावे .नवीन योजने साठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावेत .तसेच ग्रामविकास विभागाच्या धर्तीवर वयाच्या 53 वर्षा नंतर कर्मचारी यांना त्यांच्या इच्छेनुसार इच्छित ठिकाणी नेमणूक देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा