जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन मुस्लिम संघटने तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात.


सर्फराज दर्जी 
मिरज,सांगळी व कोल्हापुर मधील जनजीवन अतिवृष्टी मुळे आलेल्या पुराने विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व  स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जमियेते उलमा हिंद संघटनेचे उपअध्यक्ष मौलाना अमनुल्लाह बुरूड, तसेच जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागाचे तालुका अध्यक्ष काजी मोहम्मद हुसेन माहीमकर, मुफ्ती म्हामूद मोमीन,मौलाना मलिक कोतवाल,मौलाना रिहान करदमे,मौलाना हाकीम काळोखे,तथा रिजवान चिविलकर तर्फे पुढाकार घेण्यात आला  मिरज,सांगली,कोल्हापूर मधे पावसाच्या अती वृष्टीमुळे अहाकार झाल्याने सगळी कडे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या पुरात अनेक  नागरिक व पशु प्राणी पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने  आहेत  तेथील नागरिकांचे खाण्या- पिण्याचे हाल झाले असता  जमियेते उलमा हिंद व अंजुम ने दर्दमंदान म्हसळा- श्रीवर्धन विभाग,तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटित होऊन (10,00,000)दहा लाखची रक्कम जमा केली गेली. जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागा सारख्या   मुस्लिम संघटनेने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी  स्वतःहून पुढे आले व आर्थिक तथा ही मदत थेट कोल्हापूर-सांगली, मिरज अशा ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी टेम्पो द्वारे मोठ्या प्रमाणावर अन्न धान्य व  कपड्यांच वाटप  करण्यात आला . वस्तूंच्या स्वरूपात मदत ही करण्यात आली.  जमियेते उलमा श्रीवर्धन विभागाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात देऊन सर्व धर्म स्वभावाचा व एकोप्याचा संदेश दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

त्याच प्रमाणे सांगळी,मिरज व कोल्हापुर भागात अतिवृष्टी मुळे आलेल्या पुराने तेथील मंदिरे ही पाण्याखाली आल्याने मंदिरातील मुर्तींनवर खूप माती जमल्याने मळकट दिसत होत्या.नैसर्गिक आपत्तीत सर्व धर्म विसरून माणुसकी हा एकमेव धर्म जगात आहे याचा विचार करून या माणुसकीच्या माध्यमातून *जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागाच्या मुस्लिम संघटनेने* मंदिरातील मुर्तींना स्वचछ केले  व तेथील  मळकट झालेली फर्शी ही पाण्याने धुवून काढली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा