श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आघाडीत बिघाडी.



म्हसळ्यातील काँग्रेस (आय)च्या निर्धार मेळाव्यात बहुतांश वक्त्यांची जिल्हा नेतृत्वावर कडाडून टिका.
मेळाव्यात श्रीवर्धन विधान सभेतून काँग्रेस (आय) लढणारच चा झाला निर्धार
संजय खांबेटे : म्हसळा 
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा मूळचा काँग्रेसचाच हा धागा पकडत मेळाव्यात श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ अघाडीने काँग्रेस (आय) ला सोडावा असा प्रत्येक वक्त्याने आग्रह घरला व श्रीवर्धन विधान सभे मध्ये आपलाच उमेदवार असेल हे धोरण निश्चित केले. यावेळी काँग्रेस ( आय)चे रायगडचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, ,म्हसळा तालुका अध्यक्ष, डॉ. मुईज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष दानीश लांबे, बशीर भुरे, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका अध्यक्ष खेळू वाजे, रोहा तालुका अध्यक्ष निजाम सैयद , समीर सकपाळ या सर्वानी पक्षाचे जिल्हा धोरणावर कडाडून टिका केली. व जिल्ह्यांत काहीही होवो पण श्रीवर्धन विधान सभा कॉंग्रेस लढणारच या स्थानिक आयोजक व तालुका कॉंग्रेस ( आय ) चे अध्यक्ष डॉ. मुईंज शेख यांच्या आवाहनाला उपस्थितानी दोन हात ऊंचाऊन स्वागत केले.पक्षाची नेते मंडळी विधानसभा -लोकसभा निवडणुका आल्या की सुरवातीला चर्चेचे गुऱ्हाळ , नंतर बैठका पुढे कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे आता अधाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करा असा आदेश देतात. राष्ट्रवादीची हीच मंडळी जिल्हा परिषद - पंचायत समिती, नगरपालीका , नगरपंचायती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या की शहरांत, तालुक्यात कॉग्रेसचे अस्तीत्व काय आहे, मतदार किती असा प्रश्न विचारुन पक्षाला सहज संपवत आहेत. आशा वेळी दुसऱ्या बाजूने जिल्हा पातळीवरील काँग्रेसची नेते मंडळी आम्हाला पोरकी करतात याचेही उत्तर या नेत्याना आता द्यावे लागणार आहे या वेळी आता श्रीवर्धन मतदार संघ हा काँग्रेसचाच हीच आमची भूमिका ठाम आसल्याचा सर्व वक्त्यांचा कल होता. यावेळी काँग्रेसच्या निवडणुक व कार्यकर्ता प्रशिक्षक नंदाताई म्हात्रे यानी पक्ष संघटना वाढ बूथ, सेक्टर निहाय माहीती या विषयी कार्यकर्त्यना कल्पना दिली , जिल्हा नेते मंडळी अगर धोरणावर वक्त्यानी केलेल्या टिकेला उत्तर देण्याचे टाळले .
" श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळ्यातील कॉंग्रेसचा निर्धार मेळावा हा अंतुले विरहीत झाला, स्टेजवरील बॅनरवर सोनीया गांधीपासून बाळासाहेब थोरांतां , मुश्ताक अंतुलें पर्यंत केंद्र व राज्य नेते मंडळींचे फोटो व जिल्हास्तरावरील माणिक जगताप, मधुकर ठाकूर , श्रद्धा ठाकूर यांचे फोटो या साक्षीने जिल्हा धोरणावर बहुतांश वक्त्यानी टिका केली"


"आघाडीच्या माध्यमातून आपल्या भागातून निवडून गेलेले खासदार ,( लोकसभा, राज्यसभा ) आमदार ( विधानसभा, विधानपरिषद) ज्यावेळी धार्मिक अथवा जातीय मुद्दे ( कौमी मसले )आले की मंडळी कुढे जातात कोणाला पाठींबा देतात याचा आभ्यास प्रत्येकाने करण्याची वेळ आताआली आहे."
दानिश लांबे, अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल.

" कॉंग्रेस ( आय) पक्ष संघटना वाढ, पक्षाची ध्येय धोरणे याचा प्रचार प्रसिध्दी, पक्ष वाढ करण्यासाठी पक्षाचे मंडळीनी आशा प्रकारचे मेळावे घ्यावे असे पक्षाचे धोरण असताना महाडचे माजी आमदार जगताप मला विचारतात म्हसळयाला मेळावा कसला व का घेता? आता बस्स झाले "
ज्ञानदेव पवार, उपाध्यक्ष , रायगड जिल्हा कॉंग्रेस (आय )

" श्रीवर्धन विधान सभा मतदार संघातून ज्ञानदेव पवार,दानीश लांबे व मी स्वतः डॉ. मुईज शेख इच्छुक ऊमेदवार आहोत अजुनही इच्छुक ऊमेदवार वाढले तरी आमचे एकमत होणार आहे. व श्रीवर्धन मधुन काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच"
डॉ.मुईज शेख , अध्यक्ष म्हसळा तालुका कॉंग्रेस (आय ).

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा