म्हसळा (बाबू शिर्के)
मी एक छोटा कार्यकर्ता असून कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यात बंडखोरीचे निर्णय घेणारे राष्ट्रीय पातळीवरचे आहेत.त्यांचा बद्दल बोलायला मी मोठा नाही अशी खोचक टीका खासदार सुनील तटकरे यांनी न्यू इंग्लिश स्कुल येथे त्यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम पार पडल्यानंतर पत्रकारां जवळ बोलताना केली.ज्यांनी कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यात घराणेशाहीवर टीका केली त्यांनी सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना घराणेशाही बद्दल नेमके मत काय ते विचारावे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांची आघाडी होणार असून रायगड जिल्ह्यात महाडची जागा माणिक जगताप यांना सोडली आहे.कोणीही काही केले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.या सायकल वाटप कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली, अल्पसंख्याक अध्यक्ष नाजीम हसवारे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ करडे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, नगराध्यक्ष फलकनाज हुर्जुक, संतोष पाखड, गजानन पाखड, मधु गायकर आणी राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.म्हसळा आणी श्रीवर्धन तालुक्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान केल्याने त्यांचा मी ऋणी आहे.या दोन्ही तालुक्यांसाठी निधीची कमतरता पडणार नाही असेही पुढे बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना सांगितले. या सायकल वाटप कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील 105 गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आहे.

Post a Comment