संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
सण म्हटल की त्याला संस्कृती, पारंपरिक ता ह्या गोष्टी ना विशेष महत्व असताना म्हसळ्यातील नारळी पोर्णिमा सण पारंपारिक व विशेष उत्साहाने साजरा करण्यात आला. वास्तविक गाव शहरांत कोळीवाडा अथवा कोळी वस्ती आसल्यास हा सण उत्साहांत होत असतो परंतु म्हसळा शहरांत हा सण साजरा होण्यामागे सुमारे १५० ते २०० वर्षाची परंपरा आहे. म्हसळा शहरांतून हिंदू समाजाचे अध्यक्ष, तहसील कार्यालय (पूर्वीचे महाल ऑफीस) , पोलीस स्टेशन नगरपंचायत , दिघी नाका ते बंदर असा नारळ वाद्य वाजंत्रीत समुद्राला ( राजपुरी खाडीला ) अर्पण करण्याची परंपरा आहे. या कार्यक्रमाला जंजीरा संस्थानच्या खजीन्यातून निधी मिळत असे. कार्यक्रमांत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, Ceo, नगराध्यक्ष यानी सामिल होण्याची परंपरा आहे.आजच्या कार्यक्रमात तहसीलदार शरद गोसावी,पीआय परशुराम कांबळे, पी.एस.आय.दिपक डुस,हिंदु समाज अध्यक्ष बाळासाहेब करडे,माजी सभापती महादेव पाटील, उप- नगराध्यक्ष संजय कर्णिक,सुनिल उमरोटकर,व्यापारी संघटना अध्यक्ष नंदू सावंत, अशोक काते,योगेशशेट करडे, यतीन करडे,दिलीप करंबे,दिलीप हेंगिस्टे,गौरव पोतदार, दिपक करडे,संतोष कुडेकर,उदय कळस,बाबु शिर्के,सुशिल यादव, मच्छीन्द्र पोतदार, पो.ना.सुर्यकांत जाधव,अनिकेत जैन,सुबोध बोरकर,राहुल जैन,चेतन जैन,सुरज महागावकर,कांबळे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. म्हसळा हे जिल्ह्यांतीत राजपुरी खाडीतील अत्यंत महत्वाचे व्यापारी बंदर होते त्या काळी बहुतांश दळण वळण समुद्रा मार्गे होत असे त्यामुळे कोळी वस्ती नसली तरी म्हसळा शहरांत नारळी पोर्णिमा उत्साहांत साजरी होण्याची परंपरा आहे.
"म्हसळा हे फार जुने ख्यातनाम व सुरक्षीत असे बंदर होते,या बंदरातून फार मोठा व्यापार होत असे, हे व्यापारी बंदर होते."
कुलाबा गॅझेटीअर


Post a Comment