म्हसळ्यात रुग्णाची डॉक्टरला मारहाण व दमदाटी


( म्हसळा प्रातिनिधी)
उपचार करताना रुग्ण दगावला अगर चुकीचे उपचार झाले तर संबधीत डॉक्टर ना मारहाण करणे हे प्रकार शहरांत होत असतात त्याचे लोण आता ग्रामिण भागात आल्याची घटना आज म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली , संबधीत वृत्त असे की, येथील स्थानिक रुग्णानी आपल्या छोटया मुलाला मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केस पेपर काढायला दुपारी २ च्या दरम्यान पाठविले असता कार्यरत डॉ. प्रतिक पागारे (M.B.B.S.)यानी केस पेपर काढण्याची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत असते असे सांगितले, मुलानी तोच निरोप आपल्या वडीलाना सांगितल्यावर संतप्त झालेले वडील नी (रुग्ण) प्रा.आ. केंद्रात धाव घेऊन डॉ. प्रतिक यांच्या जवळ बाचाबाची, दमदाटी करीत त्यांच्या अंगावर मोबाईल फेकून मारल्याची घटना घडली. ही घटना दुपारी २.४५ च्या दरम्यान घडली यावेळी सुरक्षा रक्षकांना बोलावूनही घटना हाता बाहेर गेली परंतु काही वेळाने थांबली.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी काही कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला गुन्हा नोंदविण्यासाठी डॉ. प्रतिक म्हसळा पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले सुद्धा परंतु हे प्रकरण सोडून द्या आपण माफीवर भागवू असा निरोप देऊन काही नी डॉक्टरना परत बोलाऊन घेतल्याने प्रकरण थांबले आहे.

"डॉ. प्रतिक पागारे व अन्य एक महीला डॉक्टर यांची मेंदडी प्रा.आ. केंद्रात असणारी सेवा ही बंधपत्र कालावधीतील आहे, सेवा दर्जेदार व चांगली आहे. आजच्या घटनेनी त्यांची मानसिकता ढासळली आहे, मागील काही कालावधीत प्रा.आ. केंद्र मेंदडीतील दोनही वैयकीय अधिकाऱ्यांची काही महीने पद रोक्त होती तशीच वेळ भविष्यांत येऊ नये"
रुग्णाची प्रतिक्रीया.

"डॉ.पागारे यांची घटना मला कळली आहे, संबधीत रुग्णाची त्यानी रितसर तक्रार करावी असे त्याना सांगितले आहे"
डॉ. सुहास मोरे ( प्र ) ता. वैद्यकीय अधिकारी, म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा