म्हसळ्यात पूरग्रस्त मदत कक्षाची स्थापना : तालुक्यातून एकत्रित निधी संकलन करणार


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
राज्यांत सांगली , कोल्हापूर व अन्य भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधीत कुटुंबाना मदत करण्यासाठी शासनाकडून , दानशूर व्यक्ती व संस्थांकडून मोठया प्रमाणावर निधी संकलन सुरु आहे. म्हसळा तालुक्यातून गोळा करण्यात येणारी मदत एकत्रित असावी यासाठी तहसीलदार म्हसळा व प्रेस क्लबच्या माध्यमातून बैठकीचे नियोजन तहसीलदार शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक , संजय खांबेटे, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाबू शिर्के, सभापती छाया म्हात्रे, मा.सभापती महादेव पाटील, समीर बनकर, डॉ. मुईज शेख, सुरेश शेठ जैन, अशोक काते, सुशील यादव,जब्बारसींह रजपूत, नंदकुमार सावंत, मुसद्दीक इनामदार, तुकाराम पाटील,महमद रफी घरटकर, मंगेश मुंडे, निलेश मांदाडकर , उदय करडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी निधी संकलनात तालुक्यातीत सर्वांचा सहभाग असावा या उद्देशाने ग्रामिण पातळीवरील गाव वाडीवरील सरपंच, गाव अध्यक्ष यांची सभा म्हसळा कन्याशाळेत गुरु. दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १वा. घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जास्तीत जास्त निधी संकलन करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा