म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील राजिप शाळा मेंदडी येथे शासनामार्फत समग्र शिक्षा अभियानातून प्राप्त निधीतून शाळा व्यवस्थापन समिती मार्फत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती सभापती छायाताई म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करताना गणवेशाचा दर्जा चांगला असून स्वतः लक्ष घालून गणवेश खरेदी केलेबद्दल शाळा व्यवस्थापन समिती ला धन्यवाद दिले. 100% विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. मी तालुक्याची सभापती असल्याने तालुक्यात लक्ष असतेच पण मेंदडी या माझ्या गणात अधिक लक्ष असते. शाळा दुरुस्ती प्रस्ताव जिल्हा परीषदेत पाठविला असून पाठपुरावा चालू आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. शाळेत तूर्त 1 शिक्षक देण्यात येईल. शाळेय कामकाज चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
केंद्र प्रमुख गजानन साळुंखे यांनी मनोगतात जूने व नविन शिक्षण यातील होत गेलेले बदल व शिक्षणाचे महत्त्व तसेच पालकांची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक किशोर मोहिते यांनी केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी सभापती छायाताई म्हात्रे, सदस्य मधुकर गायकर, शापोआ अधिक्षक तथा केंद्र प्रमुख गजानन साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण पेरवी, उपाध्यक्ष भारती पाटील, मुख्याध्यापक किशोर मोहिते, शा.व्य.समिती सदस्य मंजुळा पाटील, वनिता पाटील, जना चव्हाण, वर्षा पाटील, चंद्रकांत पाटील, शिक्षिका सौ गितांजली भाटकर, सायली बीर्जे, अब्बास शेख, मयुरी पाटील, प्रियंका गोसावी व अन्य पालकवर्ग उपस्थित होते.

Post a Comment