प्रतिनिधी
तालुक्यातीत खरसई गावातील अर्जुन लक्ष्मण खोत वय २३ हा गोविंदा ३ऱ्या थरावरून ( अंदाजे३० फूटावरून ) पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात गोपाळकाला उत्साहात साजरा होत असताना म्हसळ्यात या उत्साहावर विरजण पडले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी वर चढलेल्या गोविंदाचा तिसऱ्या थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना म्हसळा तालुक्यातील खरसई येथे घडली.अर्जुन लक्ष्मण खोत (वय २३) असे मृत गोविंदाचे नाव आहे. अर्जुन हा श्री समर्थ रामदास सेवा मंडळ पथकातील गोविंदा होता. दरम्यान, या घटनेमुळे खरसई गावावर दुःखाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment