म्हसळा शहरासह तालुक्यात ८५२ ठीकाणी गोपाळ काला उत्साहांत साजरा


संजय खांबेेटे म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा तालुक्यात व शहरांत ८५२ खाजगी व सार्वजनिक गोपाळकाला व दही हांडी साजरी झाली. म्हसळा शहरांत ब्राह्मण आळी, सोनार -तांबट आळी, वाणी -शिंपी( पेठकर समाज ) व्यापारी मंडळ, कुंभार आळी(परीट आळी) असा सर्व समाजाचा गोविंदा फार उत्साहात पार पडला. तालुक्यात खरसई गावातील गोविंदा सर्वात अकर्षक व शिस्तबध्द होता. देऊळ आळी, कोळीवाडा, मधली आळी, डुंगी ,कातळ आळी, जय हुनुमान हे सर्वच गोविंदा आकर्षक होते. हे सर्व गोविंदा राम मंदीरा जवळ डुंगी आळीत एकत्र येतात तो क्षण अत्यंत विलोभनीय होता. तालुक्यातील सर्व गावांत म्हसळा , गोरेगांव, दिघी सागरी, श्रीवर्धन पोलीस स्टेशनतर्फ होमगार्डच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा