आडीमहाड खाडी जि.प.शाळेत गोपाळकाला(दहीहंडी) उत्सव साजरा! ; हीहंडीच्या माध्यमातून जनजागृती
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
दि.24-8-2019 रोजी रा.जि.प.शाळा-आडीमहाडखाडी ता.म्हसळा येथे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.संतोष साळुंखे सर यांच्या संकल्पनेतून व शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय निमजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजेंद्र भोगल, माजी अध्यक्ष मधुकर पवार आडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. प्रकाश म्हसकर , सदस्य, ग्रामस्थ व माता पालक यांच्या उपस्थितीत "गोपाळकाला" निमित्त शाळेत "दहीहंडी" चा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. शिक्षकांना ग्रामस्थ व पालकांचे ही खूप सहकार्य लाभले. गावातील महिलांनी सर्व बाळ-गोपाळांना भिजवण्यासाठी हंडे भरू-भरू पाणी आणून मुलांच्या अंगावर ओतले. त्यामुळे शाळेतील सर्व मुले पूर्णतः ओलेचिंब होऊन मनसोक्त नाचत होती. या बाळ-गोपाळांच्या आनंदात आज संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते. गावातील सर्व माता-पालक व ग्रामस्थ हे मोठयाप्रमानात उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवत होते. त्यातच गावातील श्री. संदीप गमरे हे आपले वाद्य घेऊन आले व ते गाणे म्हणत वाजवू लागले त्यामुळे मुलांचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला होता. व मुले वाद्यांच्या तालावर थिरकत होती.तसेच पर्यावरण,शिक्षण,स्वछता यावर घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली हे दृश्य पाहून अनेक गावकरी हे यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शेवटी मुलांनी नाचून-नाचून थकल्यावर मानवी मनोरा करून केला व त्यावर चढून अरमान या विद्यार्थ्याने अखेर "दहीहंडी" फोडली. त्यानंतर उपस्थित सर्वाना प्रसाद व अल्पोहर देऊन मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य, ग्रामस्थ, माता-पालक यांच्यासह सर्व उपस्थितांचे शाळेच्या वतीने आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment