म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणा अभावी नागरीक चिंतेत ; कर्मचाऱ्यांची नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुका अतिशय दुर्गम व डोंगराळ तालुका असुन तालुक्यातील वसलेली गावे देखील डोंगर भागातच आहेत. त्यामुळे या गावातील नागरीक आपल्या गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कायमच अवलंबुन असतात. मात्र मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यथा मात्र अतिशय वेगळीच आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर बुधवारी नवजात बालक तसेच पाच वर्षाच्या आतील बालकांचे लसीकरण केले जाते तालुक्याच्या ठीकाणी जाणे व येण्याचा होणारा खर्च टाळावा या करीता या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबुन असलेली जवळपास सतरा ते अठरा गावातील जवळपास पंधरा हजार नागरीक हे केवळ या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावुन आपल्या बालकांचे लसीकरण करतात मात्र दि.21/8/2019 रोजी लसीकरणासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी साधारणत: नऊ वाजल्यापासुनच नागरीक आपआपल्या बालकांना लसीकरणाकरीता घेवुन आले होते. यावेळी उपस्थीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे या बालकांचे लसीकरण दुपारी एक वाजेपर्यंत झालेच नाही. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी निघालेल्या या नागरीकांचा अखेर पारा सुटला व त्यांनी डॉक्टरांसहीत असलेल्या नर्सला विचारपुस करीत असता त्यांच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे मिळायला लागल्यानंतर पारा सुटलेल्या नागरीकांकडुन दवाखान्याची तोडफोड होणार त्याच कालावधीमध्ये रुग्ण कल्याण समिती सदस्य महेंद्रशेट पारेख तसेच माजी उपसरपंच नदीम कादरी व वाहतुक संधटनेचे अध्यक्ष शाम कांबळे यांनी लसीकरणासाठी आलेल्या स्त्रीयांना शांत केले व रुग्णालयातील संपुर्ण परीस्थीतीचा आढावा घेवुन कामचुकारपणा करणाऱ्या याच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन सदर लसीकरणासाठी खरसई येथे काही दिवसांकरीता नेमणुक केलेल्या परिचारीकेला पाचारण केल्यानंतर दुपारी एक वाजलेनंतर लसीकरण सुरु करण्यात आले. तेंव्हा वातावरण काहीसे निवळले व नागरीक शांत झाले.
यावेळी लसीकरणाकरीता पर्यायी परिचारीका उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपस्थीत असलेल्या जवळपास पन्नास ते साठ स्त्रीयांनी रुग्ण कल्याण समितीचे महेंद्रशेठ पारेख, माजी सरपंच नदिम कादरी, व शाम कांबळे यांचे आभार मानले.

Post a Comment