देवघर धबधबा येथे भापट शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आनंद.

                                 

प्रतिनिधी म्हसला (देवघर)
21आँगस्ट 2019 रोजी म्हसला तालुक्यातील डोंगराल भागातील वसलेली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाला भापट या शालेतील ई १ली ते ५ वी च्या  विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचा आनंद निसर्गरम्य वातावरणात घेतला .                           सध्या पावसाच्या वातावरणात वर्षा सहलीचे आयोजन मोठ्या उत्साहाने दिसत आहे अशा परिस्थितीत भापट   शालेतील विद्यार्थांनी सर्व प्रथम श्री अमृतेश्वर मंदिर या मंदिरात शंकराच्या देवाचे दर्शन घेण्यात आले तसेच सभोवताली पांडवकालीन शिल्पकला ,कालकाई देवीचे दर्शन घडले. मंदिराच्या शेजारी लागून असलेल्या धबधब्यावर मनसोक्त विद्यार्य्थांनी आनंद लुटला नदी लगत असणार्या झाडे,पाने,फुले जलचर प्राणी यांची माहिती श्री अजय केंद्रे सर यांनी सांगितली. वर्षा सहलीच्या माध्यमातून विद्यार्थांना परिसर अभ्यास,विज्ञान विषयाशी निगडीत माहिती श्री जयसिंग बेटकर सर यांनी दिली.यावेली शालेय विद्यार्य्थांनी पोहण्याचा आनंद लुटला ,पावसाच्या सरींनी विद्यार्थ्यीं न्हाऊन निघाले.यावेली सहली  ठिकाणी पालक लक्ष्मण मोहिते,कमलेश बेटकर मुख्याध्यापक अजय केंद्रे सर,उपशिक्षक जयसिंग बेटकर सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा