श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल येथे मगरीचा संचार ; लोकांमध्ये भयाचे वातावरण



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

  श्रीवर्धन तालुक्यात यावर्षी जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक वन्यजीव आपला निवारा सोडून लोकवस्ती मध्ये घुसत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. श्रीवर्धन शहरापासून 6 किमी अंतरावर कोंडविल समुद्रकिनारी मगरीचा वास्तव्याने स्थानिक जनता भयभीत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सकाळी 11वाजण्याच्या जवळपास कोंडविल समुद्रकिनारी असलेल्या  अंदाजे साडे चार फूट लांबीची मगर लोकांच्या निदर्शनांस आली. सदरची बाब वनविभाग व प्राणीमित्र संघटनेला समजल्यानंतर त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. परंतु मगर बघण्यासाठी मोठ्या स्वरूपात लोकांनी गर्दी केली होती. लोकांचा आरडा ओरडा ऐकून मगर पुर्ववत समुद्र लगतच्या गवताळ भागात आत बाहेर जात आहे. त्या कारणास्तव मगरीला पकडण्यासाठी वन खाते व प्राणी मित्र यांना अपयश येत आहे. कोंडविल सारख्या भागामध्ये मगर आढळणे ही चिंतेची बाब असून अजून किती मगरीच वात्सव्य या ठिकाणी आहे याविषयी प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. आज आढळलेल्या मगरीच्या आकारावरून तिच्या सोबत इतरही मगरी असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. यापूर्वी हरिहरेश्वर या ठिकाणी  वनखाते आणि प्राणीमित्र संघटनेने मगर पकडल्याची घटना घडली आहे .

आम्हांला सकाळी कोंडविल येथे मगर असल्याचे समजले त्या नुसार आम्ही घटनास्थळी धाव घेतली परंतु लोकांच्या अवाजवी गर्दी ला घाबरून मगर समुद्र किनाऱ्याच्या लगतच्या भागात  जा येत करत आहे .त्यामुळे मगरीला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही .परंतु आम्ही लवकरच तिला पकडू ...
अनिरुद्ध नागवेकर (  प्राणीमित्र संघटना वी नेचर फ्रेइंड सभासद )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा