संजय खांबेटे : म्हसळा
दिघी - पुणे राष्ट्रीयमार्गावरील मेंदडी जवळील पूल खचला असून पर्यटक व दिघी बंदरा वरील वाहतुकदाराना जिकरीचे झाले आहे.एम.एम.आर.डी.ए.ने तात्काळ लक्ष न घातल्यास भविष्यात दिवेआगर दिघीसह परिसरातील वारळ,काळसूरी, रोहिणी तुरुंबाडी,गोंडघर या गावातील तब्बल नऊहजार ग्रामस्थांचा म्हसळा तालुक्यासोबत संपर्क तुटण्याची
शक्यता आहे किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल . जुन्या १९ टन क्षमतेच्या राज्य मार्गावर दिघी पोर्टचे २५ ते ३o टनी वजनाचे ट्रेलरच्या सततच्या वाहतुकीने पुलाचे नुकसान झाल्याचे समजते.माणगाव ते दिघी या रस्त्यावरील अनेक छोटया मोऱ्याना केवळ किरकोळ डागडुजी केली आहे व त्यावरुन अवजड वाहतुक केली जाते त्यामुळेच असे कमी जास्त प्रकार सतत होत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.
"मेंदडी येथील कमकुवत असणारा पूल जो पर्यंत नवीन बांधून होत नाहीतो पर्यंत या पूलावरून दिघी पोर्टची अवजड वाहतूक बंद करावी,नाहीतर दिघी पोर्टच्या अवजड वहतुकी विरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल "
श्रीमती छाया म्हात्रे सभापती, पं.स. म्हसळा

Post a Comment