म्हसळ्यात एकाच गावात पाच ठिकाणी घरफोडया


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरूच असून तालुक्यातील कोंझरी या गावात पाच घरांमध्ये घरफोडी करून एकूण 14900 रु किमतीच्या वस्तू चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.या बाबत माणिक मोतीराम विचारे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे कि माणिक विचारे हे आपल्या बंद घराची साफ सफाई करण्याकरिता मुंबईवरून आले असता छपराची चार कौले नसल्याचे निदर्शनात आले.त्यानंतर सामानाची पाहणी केली असता तांब्याची भांडी, शेगडी,स्टोव्ह इत्यादी वस्तू चोरून नेल्याचे समजले.या चोरी बद्दल शेजारी सांगितले असता शेजारी बंद असणारी संदीप विचारे, नरेश विचारे, अनिल विचारे, संतोष विचारे यांचा घरी सुद्धा चोरी झाल्याचे निदर्शनात आले.यांचा घरातून सुद्धा तांब्याची भांडी, रोख रक्कम, पितळेच्या वस्तू चोरी झाल्याचे लक्षात आले.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्याम कराडे करीत आहेत.या घरफोडीमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये व पंचक्रोशी मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.




"तीन दिवसापूर्वी कोंझरी शेजारील कोळे या गावात हनुमान मंदिरातील दान पेटी फोडण्यात आली होती. याबाबत पोलीसांत माहीती देऊनही म्हसळा पोलीसानी गांभीर्य न घेतल्याने ग्रामिण भागातही घरफोडयांचे प्रमाण वाढत आहे"
अमोल पेंढारी, माजी सरपंच , कोळे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा