विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे - खासदार सुनिल तटकरे यांचा सल्ला


● म्हसळ्यात विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न

● विधानसभा आघाडीचा उमेदवार ठरविण्या इतपत मी मोठा नाही, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता - काँगेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना टोला

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी मनाशी जिद्द, चिकाटी बाळगून तसेच नवनवीन शैक्षणिक तंत्रदान अवलोकन करून उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना दिला आहे. 
   खासदार सुनिल तटकरे यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिकेत तटकरे व जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून दि.19 ऑगस्ट रोजी न्यु इंग्लिश हायस्कूल म्हसळा येथे सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मागील काही वर्षांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षांमध्ये कोकणातील मुलींनी "लातूर पॅटर्न" मोडीत काढत सातत्याने बाजी मारण्याचा पराक्रम केला आहे याचा मनस्वी आनंद होत असून हीच परंपरा कायम राखली पाहिजे. तसेच उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर, वरिष्ठ सरकारी अधिकारी या पदांवर काम करावे. मुलींनी सायकल चालवता चालवता एक दिवस विमान चालवण्याची जिद्द बाळगावी आणि पायलट बनावे अशा शुभेच्छाही दिल्या. आगामी काळात तालुक्यातील शैक्षणिक विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना प्रत्येक शाळेत राबविल्या जातील. अल्पसंख्याक, बौद्ध किंवा अन्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
  आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदार संघ काँग्रेस पक्षाला द्यावा नाहीतर बंडखोरी करू या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना तटकरे यांनी सांगितले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे आघाडीच्या उमेदवारी बाबत निर्णय घेण्यात इतपत मी मोठा नाही असा टोला काँग्रेसचे पदाधिकारी यांना लगावून माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या नेत्यांना घराणेशाही काय असते हे विचारण्याची हिम्मत दाखवावी आणि मग माझ्यावर आरोप करावेत असे प्रतिउत्तर देताना आघाडीच्या उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब, शेकापचे नेते जयंतभाई पाटील, काँग्रेस व मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसवून ठरवतील असेही सांगितले.
ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता सरकार मधील शिवसेनेच्या आरोग्य मंत्र्यांची आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. तरीही जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून मतदारसंघाचा खासदार या नात्याने मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
जिप अध्यक्षा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करीत असल्याचा आनंद होत असून सायकल चालविताना विद्यार्थिनींनी वाहतुकीचे नियम पाळावेत अशा सूचना दिल्या.

   यावेळी तालूक्यातील शाळांमधील एकूण 105 विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल वाटप करण्यात आल्या.
  आयोजित कार्यक्रमासाठी खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली, शेकाप नेते श्रीपत धोकटे, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष नाझीमभाई हसवारे, जिल्हा संघटक बालशेठ करडे, जेष्ठ नेते भाई दफेदार, तालुका अध्यक्ष समीर बनकर, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, मुंबई कमिटी कार्याध्यक्ष जयंत चिंबडे, जिल्हा मुख्य संघटक शाहिद उकये,  नगराध्यक्ष फळकनाझ हुर्जुक, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, माजी सभापती उज्वला सावंत, पस सदस्य मधुकर गायकर, जिप सदस्या धनश्री पाटील, शहराध्यक्ष रियाज घराडे, उप शहराध्यक्ष चंद्रकांत कापरे, महिला शहराध्यक्षा शगुप्ता जहांगीर, युवक अध्यक्ष फैसल गिते, नगरसेविका जयश्री कापरे, शितल मांडवकर, श्रीवर्धन मतदार संघ युवक अध्यक्ष संतोष पाखड, आंबेत गण अध्यक्ष जयवंत सावंत , वरवठणे गण अध्यक्ष सतीश शिगवण, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, मेंदडी गण अध्यक्ष जुहूर काजी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष रियाज फकी, जेष्ठ नेते लक्ष्मण कांबळे, प्राचार्य बी.एन. माळी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा