अपघात : श्रीवर्धन बोडणी घाटात ट्रक पलटी



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन येथील बोडणी घाटात मालवाहू ट्रक पलटी झाला आहे .सायंकाळी  5 वाजण्याच्या सुमारास  ट्रक नंबर  M H 18 A A 8315  श्रीवर्धन कडे  माल घेऊन येणारा  वळणार पलटी झाला आहे .  
चालकास वळण रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे व चालकाचे वाहनां वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या  बाजूला पलटी झाला .  ट्रक मधील व्यापारी माल घटनास्थळी पडलेला आहे .सदर अपघातातील चालक फरार झाला आहे  .श्रीवर्धन पोलीस ठाण्यात उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा