संगणक परिचालकांचा ट्विटर मोर्चा देशपातळीवर ट्रेंडींगवर ; ट्विट हल्ल्यापुढे शासन निरुत्तर


फोटो श्री.मयुर गणेश कांबळे, राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना



संगणक परिचालकांचा ट्विटर मोर्चा देशपातळीवर ट्रेंडींगवर

● ट्विट हल्ल्यापुढे शासन निरुत्तर

● शासनावर डिजिटल मोर्चा

● महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची प्रमुख मागणी

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

     राज्य शासनाच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन देऊन निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी  कामबंद अंदोलनाबरोबर डिजिटल महाराष्ट्रात काम करत असल्यामुळे 26 ऑगस्ट रोजी ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी 06 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत ट्विटर मोर्चा करण्यात आला होता. त्यात देशपातळीवर क्रमांक 1 वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेऊन आंदोलन करून शासनापुढे अनेक प्रश्न मांडले. 
     याबाबत सविस्तर वृत्त की राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे सर्व संगणक परिचालकासह 351 पंचायत समित्या व 34 जिल्हा परिषदा मधील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याच्या मागणी सह इत्तर मागण्यासाठी 19 ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून शासनाने अद्याप पर्यंत दखल न घेतल्यामुळे दि.26 ऑगस्ट रोजी ट्विटर वर ट्विटर मोर्चा ठेवण्यात आला होता. त्यात राज्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कलावधीत सहभाग घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना ट्विटर वर टॅग करून देशपातळीवर #संगणकपरिचालक हा हॅशटॅग दिवसभरात अनेकवेळा क्रमांक 1 वर ठेवला होता. संगणक परिचालकांनी केलेल्या ट्विट हल्ल्यापुढे शासन निरुत्तर झाले असून सोशल मीडियावर देशात सर्वात प्रभावी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना असल्याचे या संघटनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.


28 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यासह राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन - मयुर कांबळे, राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष
  
  राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामध्ये रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक परिचालक सामील झाले असून रायगड मधील सुमारे 500 संगणक परिचालकांचा यात समावेश असून दि.28 ऑगस्ट 2019 रोजी सर्व संगणक परिचालक प्रत्येक पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करणार आहेत. या कामबंद मुळे नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्रास होत असून मा.मुख्यमंत्री महोदयांनी 8 महिन्यांपूर्वी 8 दिवसात निर्णय घेण्याचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे अन्यथा आमचे कामबंद असेच चालू राहील आणि मग मुख्यमंत्री साहेबांच्या स्वप्नातील डिजिटल महाराष्ट्र कोमात गेल्याशिवाय राहणार नाही.
श्री.मयुर गणेश कांबळे, राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना


प्रमुख मागण्या-
1) राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे. 
2) पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.         
3) सर्व संगणक परिचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन पंधरा हजार रुपये  द्यावे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा