पुरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीवर्धन तहसिलदार दारोदारी ; निधी संकलनासाठी विद्यार्थ्यांनी काढली फेरी



पुरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीवर्धन तहसिलदार दारोदारी ; गोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढली निधी संकलनासाठी फेरी

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी
कपडे होते करदमलेले , केसावरती पाणी
क्षणभर बसला , नंतर हसला बोलला वरती पाहून , 
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा .  
कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या शब्दांची आठवण  या वर्षीच्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला करून दिली .सातारा ,सांगली व कोल्हापूर मधील जनजीवन विस्कळीत झाले .नैसर्गिक आपत्ती ने झालेल्या कुटुंबाना आधार देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात आला . श्रीवर्धन तालुक्यातील गोखले कॉलेज , तहसीलदार व पोलीस यांनी संयुक्तिक पणे श्रीवर्धन शहरात घरोघरी जाऊन पुरग्रस्तांसाठी निधीचे संकलन केलं. गोखले कॉलेज , एस टी स्टँड, शिवाजी चौक, मच्छी मार्केट,मुघल मोहल्ला, बुडन पाखाडी, चौकर पाखाडी ते पेशवे स्मारक  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 47,832 रुपयांच्या निधीचे संकलन करण्यात आले. श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, गोखले कॉलेज चे प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी श्रीवर्धन शहरातील व्यावसायिक , नोकरदार व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून पूरग्रस्तांना मदतीसाठी आव्हान केले. गोखले कॉलेजच्या 205 विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा.... मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा अशा भावनिक घोषणांनी श्रीवर्धन शहर पिंजून काढले. सर्वसामान्यांची   पूरग्रस्तां विषयीची आस्था ,आपुलकी , स्नेह व दायित्व याचे दर्शन सर्वत्र निदर्शनांस आले. निधी संकलनासाठी विद्यार्थ्यांच्या सोबत गोखले कॉलेज चे प्राध्यापक भोसले सर, जोंधळे सर, गोरुळे सर, नाझरे मॅडम, चव्हाण सर, भोईर सर, पथरबे मॅडम यांनी सहभाग घेत श्रीवर्धन मधील जनतेला पूरग्रस्थांसाठी मदतीचे आव्हान केले

महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदतीसाठी असंख्य हात पुढे येत आहेत. श्रीवर्धन मधील जनतेने पुरग्रस्थाना सढळ हस्ते मदत केली आहे. श्रीवर्धन शहरातील निधी संकलनानंतर तालुक्यातील प्रत्येक गावातून येणाऱ्या निधीच्या  एकत्रीकरण करून सदरचा निधी पूरग्रस्त भागातील प्रशासनाकडे पाठवला जाईल............ जयराज सूर्यवंशी ( तहसीलदार श्रीवर्धन) 

आज गोखले कॉलेज, पोलीस प्रशासन व तहसिल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निधी संकलनासाठी फेरी काढली गोखले कॉलेजच्या 205 विद्यार्थ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.......श्रीनिवास  जोशी( प्राचार्य गोखले कॉलेज)

गोखले कॉलेजच्या मुलांनी पुरग्रस्थांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला श्रीवर्धन मधील जनतेने उदंड प्रतिसाद दिलेला आहे. सकाळी 9 ते दुपारी 1  पर्यंत पूर्ण श्रीवर्धन शहरात विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही निधी संकलन केले आहे. .......बाळकृष्ण जाधव ( पोलिस निरीक्षक श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा