नारीशक्ती सन्मान महोत्सव व रक्षा बंधन निमित्ताने भाजपाने घेतला महीला मेळावा
(म्हसळा दि १६, प्रतिनिधी)
म्हसळ्यामध्ये रक्षा बंधन पर्व- नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजपा म्हसळाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कुणबी समाज हॉल मध्ये म्हसळा तालुका भाजपा महिला मोर्चा च्या वतीने महिला मेळावा यशस्वी पार पाडण्यात आला. संपूर्ण तालुक्यातून झालेली महीलांची उपस्थिती लक्षणीय ठरत असतानाच म्हसळ्यात महीला वर्ग मोठया प्रमाणावर भाजपाकडे आकर्षीत होत आहे असे उपस्थितानी सांगितले. यावेळी या मेळाव्यास श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री कृष्णा कोबनाक यांचे प्रमुख मार्गदर्शन तर श्रीवर्धन विधानसभा महिला संयोजक सौ हेमा मानकर, सहसंयोजक सौ यशोधरा गोडबोले जिल्हा चिटणीस प्राजक्ता शुक्ल, सौ. मिना टिंगरे यांचेही मार्गदर्शन झाले.
संपूर्ण देशात व राज्यात भाजपा सरकारने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना उत्तेजन देण्यासाठी सुरू केलेल्या महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या योजना, मातृ वंदन योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान उज्वला गॅस योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना अशा विविध योजनांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.
भाजप व कृष्णा कोबनाक यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास आपला सहभाग नोंदविला. यावेळी कोबनाक यांनी महिलांचे मनोबल उंचविण्यासाठी विशेष मार्गदर्शनही केले तसेच भाजप सरकारच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय करण्यासाठी सरकारच्या विविध योजनांची परीपूर्ण माहीती देऊन आवश्यकता वाटल्यास योजनांचा शासन दरबारात पाठपुरावा करण्याचे कोबनाक यानी आश्वासन दिले.
महीला मेळाव्यात तटकरे पिता पुत्रांवर कोबनाक यांची सडकून टीका
महीलाना विविध विषयांत मार्गदर्शन करताना कृष्णा कोबनाक यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे व त्यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात व केंद्रात भाजपचे शासन आहे विविध नविन योजनांची अंमल बजावणी राज्य व केंद्र करीत असताना हे दोघे श्रेय लाटण्याचे खोटे काम करीत आहेत. विविध विकास कामापासून अपतकालीन निधी देण्यापर्यत यांचा खोटा हात कसा याची अनेक उदाहरणे कोबनाक यानी दिली. यामध्ये पुणा- माणगाव -दिघी हा राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री सडक योजना , अपतकालीन व अपतग्रस्ताना निधी यातही हे दोघेही लूडबूड करतात. परंतु आता तालुक्यातील महिला व सर्व मतदार जनजागृतीच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून हुशार झाली आहे, या मतदार संघात सर्वाधिक कामे भाजपा सरकार ने केली आहेत ,एक रुपयांची खासदार निधी ची कामे अद्याप सुरू झाली नसून लोकांना खोटे बोलून योजना लाटाचे कम तालुक्यात व मतदार संघात आता राजकारण चालणार असे कोबनाक यानी ठासून सांगितले.
कार्यक्रमाला महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. मीना टिंगरे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे आभार मानले. या महिला मेळाव्यासाठी म्हसळा माजी पंचायत समिती सदस्य सौ प्रियांका शिंदे, उपाध्यक्षा सौ रुपाली भायदे, सौ धनश्री मुंडे, सल्लागार सौ कल्पना कोठावले, आशा पाटील व श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस, श्री. प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस, श्री. गणेश बोर्ले तालुका उपाध्यक्ष, श्री.सुनिल शिंदे तालुका अध्यक्ष किसान मोर्चा, श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस, श्री.शरद चव्हाण तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, श्री.मनोहर जाधव तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, श्री.समीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा, श्री. प्रशांत महाडिक तालुका चिटणीस युवा, श्री.रावजी घाणेकर, राकेश हेलोंडे, प्रल्हाद महाडिक, तसेच म्हसळा तालुक्यातील सर्व मंडळ पदाधिकारी, मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
फोटो . मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री कृष्णा कोबनाक व उपस्थित महीला.


Post a Comment