श्रीवर्धन मध्ये गोविंदा पथका समवेत परदेशी पर्यटकांचा पारंपरिक नृत्यात समावेश
श्रीवर्धनच्या गोकुळाष्टमी ची आगळीवेगळी परंपरा
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील गोकुळाष्टमी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते .शहरातील प्रत्येक पाखाडी मधील मंडळे आपल्या गोविंदा पथका समवेत संपुर्ण गावात पारंपरिक नृत्य सादर करत दिवस भर सगळ्या पाखडींमध्ये फिरतात .हातात गदा , कपाळी भगवी पट्टी व मुखा द्वारे कुलदैवताचा जयघोष व श्रीकृष्ण की जय , श्रीराम की जय , गणपती बाप्पा मोरया करत गोविंदा पथके मनसोक्त आनंद घेत नाचतात . गोविंदा पथकातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे हात हातात गुंफून लांबची लांब दावन तयार करतात .लहान मुलां पासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांनी मिळून तयार केलेली मानवी साखळी प्रेम व एकोप्याची भावना व्यक्त करते .श्रीवर्धन शहरातील संपूर्ण तरुणाई गोविंदयाच्या रंगात रंगून गेल्याचे चित्र निदर्शनांस येते .ग्रामदेवता सोमजाई च्या प्रांगणात लोकांची भरगच्च गर्दी जमा होते .दहीहंडी सोबत अनोखे नृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असते .श्रीवर्धन मधील जनता रूढी व परंपरा पाळण्यात अग्रणी आहे .
श्रीवर्धन मध्ये गोकुळाष्टमी च्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना गोविंदा पथकांचे नृत्य बघून नृत्य करण्याचा मोह आवरला नाही .त्यानी सुद्धा पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला .परदेशी पाहुण्यांचे नृत्याने सर्वांना आश्चर्य चकित केले .श्रीवर्धन मधील वाणी आळी , कसबा पेठे , नवीन पेठ ,महेश्वर पाखाडी , दांडा , पेशवे आळी , दाबक पाखाडी , गणेश आळी , चौकर पाखाडी , कोंड व नारायण पाखाडी येथील सर्व मंडळांच्या गोविंदा पथकांनी पारंपरिक नृत्य सादर करत श्रीवर्धन शहराला प्रदक्षिणा घातली .श्रीवर्धन शहराची ग्रामदेवता माता सोमजाई च्या प्रांगणात भव्य दहीहंडी बांधण्यात आली होती .कसब्यातील दहीहंडी दांडा भंडारी समाजाच्या गोविंदा पथकाने फोडली .श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी प्रत्येक गोविंदा पथकाचे नारळ व हार देऊन सत्कार केला आहे .

Post a Comment