प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
बुधवार दिनांक १४ आॅगस्ट, २०१९ रोजी श्रीवर्धन मतदार संघातील शक्ती -तूरा नाच मंडळ स्पर्धा साहीत्य संघ मंदिर, गिरगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन अॅड. रामचंद्र मेंदाडकर, अनुसूचित जमाती विधी तज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत श्रीवर्धन मतदार संघातील १५ नामवंत नाच मंडळाने सहभाग नोंदवला व आपल्या कोकणातील गौरी- गणपती निमित्ताने जे मंडळे पुर्वतयारी करतात यांच्या साठी उत्तम व्यासपीठ श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णा कोबनाक यांच्या प्रयत्नाने व आयोजक श्री विनोद मानकर व त्यांचे मंडळ लक्ष्मीनारायण नृत्य कलापथक ,मांदाड, तालुका तळा यानी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले . उत्तम व्यवस्था , सर्व सहभागी संघाना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले, समालोचक पांडुरंग पाटील, रमाकांत चुनेकर, जनार्दन पाटील निरीक्षक म्हणून नामवंत कोकण भुषण शाहीर तुकाराम मानकर,अॅड.यशवंत साधू, अनंत गायकवाड, भालचंद्र दामाद , महादेव भाने, अशोक पाटील, शंकर भारदे गुरुजी व अन्य ढोलकी पटू यांनी काम पाहिले व रंगदेवता नाच मंडळ, मांदाड, ता.तळा या मंडळाने पटकावले. दुसरा क्रमांक अबाजी नृत्य पथक व तिसरा क्रमांक राेहीणी तालुका ता. म्हसळा यानी पटकावले.याना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्ति पत्रक देण्यात आले. संपूर्ण हाॅल नाच रसिकांच्या उपस्थिती मुळे खचाखच भरला होता व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता सुरू झाला व श्रीवर्धन मतदार संघातील श्रीवर्धन, तळा, रोहा, माणगाव, रोहा व म्हसळा तालुक्यातील नाच मंडळाने सहभाग नोंदवला होता. सर्व मंडळाने बक्षिसे मा. श्री कृष्णा कोबनाक व उपस्थित जेष्ठ पदाधिकारी व निरीक्षक यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाला कोळी महासंघाचे नेते,आमदार रमेश दादा पाटील , आमदार प्रशांत ठाकूर सह अनेकांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल आयोजक श्री विनोद मानकर यांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment