म्हसळा शहरात पेट्रोल आणि डिझेल तेल विक्रेत्यांकडे मालात आणि दरात तफावत दिसुन आल्याने योग्य ती तपासणी व्हावी - तुकाराम पाटील
म्हसळा -वार्ताहर
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील माणगाव-गोरेगाव- श्रीवर्धन राज्य मार्गावर हमरस्त्यालगत 100 मीटरच्या अंतरावर लागोपाठ तीन पेट्रोल पंप आसुन ते वेगवेगळ्या कंपनीचे तेल खरेदी व विक्री करतात या ठिकाणी विक्री करत असलेल्या पेट्रोलच्या दरात आणि तेलाच्या दर्जात थोडी अधिक तफावत आढळुन येत असल्याचे म्हसळा तालुका समनव्य समिती सदस्य तुकाराम पाटील यांनी निदर्शनास आणुन देताना सांगितले.पाटील यांनी म्हसळा शहरातील जानव्ही हिंदुस्तान पेट्रोल,इंडियन ऑइल अमोल पेट्रोल आणि भारतचे कादरी पेट्रोल या तीन ठिकाणच्या पेट्रोल,डिझेल विक्रेते पंपावर एकाच वेळी प्रत्येकी एक लिटर पेट्रोल बाटलीत भरून घेतले असता जानव्ही पेट्रोल पंपावर एक लिटरचा दर 79.19,अमोल पेट्रोल पंपावर 79.17 आणि कादरी पेट्रोल पंप येथे लिटरचा दर 79.37 असा असुन जान्हवी व अमोल पेट्रोल पंपावरील बाटली बंद असलेल्या पेट्रोलच्या रंग गडत लाल तर कादरी पेट्रोल पंपावरील बाटलीबंद पेट्रोल चा रंग फिकट लाल असा फरक आढळुन आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दाखवुन दिले आहे. म्हसळा शहरात तीन वेगवेगळे पेट्रोल विक्रेते शासकीय खरेदी विक्री दर ठरवुन देत दरात आणि मालात एवढा तफावत कसा काय करू शकतात या बाबत तुकाराम पाटील यांनी महसूल विभागाचे अधिकारी श्री सानप यांचे निदर्शनास आणून देत लेखी तक्रार केली आहे.या बाबत योग्य तो तपास करून जनतेची दिशाभूल किंवा होणारी फसवणुक थांबली पाहिजे अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे.

Post a Comment