प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तहसिल कार्यालयांतर्गत देवघर तलाठी सजेचे कोतवाल म्हणून कार्यरत असलेले श्री अमोल धोंडू शिगवण यांचा सन २०१८ / २०१९ मध्ये उल्लेख निय काम केल्याने आज महसूल दिनाचे औचित्य साधत कर्जत येथे पार पडलेल्या कार्यक्रमात रायगडचे जिल्हाधिकारी डॅा विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलें . मूळचे देवघर या छोट्याशा खेडयातील असलेले श्री अमोल शिगवण हे पदविधर असूनही कोतवाल म्हणून देवघर तलाठी सजेमध्ये गेली ११ वर्षे कार्यरत आहेत . शेतकरी व तलाठी यांच्यातील दुवा समजल्या जाणाऱ्या कोतवाल पदाची भूमिका प्रामाणिक पणे पार पाडणारे श्री शिगवण हे या सेवेबरोबरच आपतकालीन सेवेत नेहमी पूढे राहून आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन केली . शेतसारा वसूली असो अथवा शासकिय योजना व निवडणूकीचे कामकाज असो श्री शिगवण हे नेहमीच पुढाकार घेत असत . त्यांच्या या प्रामाणिक पणाचे फळ म्हणून त्यांचा माननिय जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला सन्मान हा त्यांच्या कामाची पोहच पावती असून त्यांच्या या सन्मानाबद्दल देवघर ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

Post a Comment