शेतकरी सन्मान कार्यक्रम व निवड अतीशय योग्य :गटविकास अधिकारी प्रभे


म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा प्रेस क्लब ने आयोजीत केलेला शेतकरी सन्मान कार्यक्रम व शेतकऱ्यांची केलेली निवड अतीशय योग्य व अभ्यासू आसल्याने कार्यक्रमाने यशस्वी उंची गाठली असे म्हसळा तालुका प्रेस क्लबच्या शेतकरी सन्मान कार्यक्रम व शेतकऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित म्हसळा पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी वाय.एन. प्रभे यानी सांगितले. यावेळी म्हसळा आदीवासी वाडीवरील यशवंत पवार ( फळ उत्पादक) व गौळवाडीतील दशरथ सखाराम काते ( दुग्ध व्यवसायीक ) यांचा आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वन विभागाचे सुर्यतळ यानी शेतकरी व पत्रकार यांच्यावर काव्य रचले व निधडया आवाजात लय बध्द गायले , त्यामध्ये शेतकरी कसत असलेल्या जमीनी, मिळणारा बाजार भाव, पत्रकार समाजासमोर मांडत असलेले विविध विषय ही सुद्धा बौध्दीक मशागतच असते आणि पत्रकारानी शेतकऱ्यांचे कौतुक व सत्कार हे फार मोठे सकारात्मक काम आसल्या बाबतचे कौतुक आपल्या स्वरचीत गाण्यातून केले. जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यानी तालुक्यातील पत्रकार शासनाचे काम करीत आहे, शासनाचे धोरण समाजापुढे नेयचे अभ्यासू व सकारात्मक काम करीत आहेत हे सांगितले त्याना तुम्ही विविध विषय द्या आणि समाजाभिमुख शासनाचे निर्णय समाजात पोहचवा असे सांगितले,पो.नी. कांबळे, माजी सभापती महादेव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यानी मनोगत व्यक्त करताना तालुका प्रेस क्लब नेहमीच चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवित असतात आमच्या सर्वांच्या त्याना शुभेच्छा आहेत असे कौतुकानी सांगितले. कार्यक्रमाला CDPO व्यंकट तरवडे, वन विभागाचे बाळकृष्ण दादा गोरनाक, नगराध्यक्षा फलक हुरजुक आदीवासी वाडी व गौळवाडी वरील अनेक कार्यकर्ते शेतकरी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार सुशिल यादव व प्रस्तावना अशोक काते यानी केली. मान्यवराचे स्वागत अध्यक्ष बाबू शिर्के, पत्रकार महेश पवार,उदय कळस यानी केली.

उपस्थिताना संबोधीताना ग. वि.अ. वाय.एन.प्रभे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा