राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळयात विद्यार्थ्याना करणार सायकल वाटप.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमीत्त तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थीनीना सायकल वाटप कार्यक्रम सोमवार दिं .१९ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १ वा.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कुल चे भव्य पटांगणात खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार आसल्याचे सांगण्यात आले. ही संकल्पना विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांची आहे. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थीनाना फायदा होणार आहे . कार्यक्रमाला आमदार अनिकेत सुनिल तटकरे, जि.प. अध्यक्षा अदिती सुनिल तटकरे, पक्षाचे उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे, तालुका अध्यक्ष समिर बनकर, सभापती छाया म्हात्रे, बाळशेठ करडे, शहर अध्यक्ष रियाज उर्फ हाजीसाब घराडे, जिल्हा महिला संघटक वैशाली सावंत, जि.प. सदस्य बबनशेठ मनवे, कुमारी धनश्री पाटील, आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा