श्रीवर्धन मध्ये वृक्ष संवर्धनाचा अभिनव उपक्रम : तालुक्यातील तहसिल,प्रांत, सामाजिक वनीकरण व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार ; जैवविविधता संवर्धनासाठी मियावाकी पद्धतीने वृक्षांचे लागवड ; मानव निर्मित जंगल निर्मितीचा प्रयत्न
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
जागतिक तापमानाच्या अनिष्ट परिणामापासून वाचण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक आहे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी परिणामकारक व ठोस भूमिका घेणे अगत्याचे आहे. श्रीवर्धन हा वनराई ने समृद्ध असलेला तालुक्यामध्ये मियावाकी पद्धतीने वृक्षांचे संवर्धन करून कमी जागेत जंगल निर्मितीचा प्रयत्न करण्यात येत आहे.
श्रीवर्धन तहसिल कार्यालयाच्या उजव्या बाजूला मियावाकी पद्धतीने कोकणामध्ये आढळणाऱ्या विविध जातीच्या वृक्षांचा वापर करून जंगल निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी रानवली येथील सामाजिक वनीकरणातून 917 रोपांची आयात करण्यात आली. या रोपांमध्ये आवळा, हिरडा, बेहडा, कोकम, बहवा, फणस, काजू, शिसव, सप्तपर्णी, रिठा, चिंच, जांभूळ, कवळ, ऐन, आपटा, सीताफळ, उंबर, करंज अश्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश करण्यात आला आहे. ही झाड लावण्यासाठी 40 × 80 × 62 लांबी व 2 मीटर रुंदी असलेल्या बेड ची निर्मिती करण्यात आली आहे. सदरचा बेड निर्माण करण्यासाठी सुरवातीला जमीन भुसभुशीत करणे, त्यामध्ये खत मिसळणे, माती टाकणे या पद्धतीचा अवलंब केला जातो. बेड तयार झाल्यानंतर एक्स वर्ग पद्धतीने रोपांची लागवड करण्यात आली. या मियावाकी पद्धतीत डाव्या व उजव्या बाजूला लावण्यात आलेली रोपे हे विस्तारित होणाऱ्या प्रजाती चे असून मध्ये ठेवलेले रोप हे उंचीला जास्त वाढणाऱ्या जातीची आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या अटल आनंदवन घन वन प्रकल्प या योजनेचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुका वनसंपदेणे समृद्ध असला तरी सुद्धा नजीकच्या काळात वाढलेल्या शहरीकरणामुळे तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडण्यात आले. त्याचा परिणाम गतवर्षी दुष्काळाची दाह श्रीवर्धन मधील जनतेला सहन करावी लागली. अवाजवी वृक्षतोडीमुळे त्याचा परिणाम श्रीवर्धन परिसरातील भुजल पातळी वातावरणीय बदलावर झाला. हवेतील उष्मा वाढल्या कारने श्रीवर्धन तालुक्याच्या तापमानात गेल्या वर्षी अमुलाग्र वाढ झाली .श्रीवर्धन मध्ये मियावाकी पद्धतीने कमी जागेत जास्त झाडाची लागवड करून जंगल निर्मितीचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास त्याचे सकारात्मक दूरगामी परिणाम तालुक्यातील जैवविविधते वर होऊ शकतात .
श्रीवर्धन तहसिल कार्यालयाच्या आवारात पर्याप्त जागा उपलब्ध होती .सदरच्या उपक्रमात स्थानिक भागात वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या सभासदांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
-जयराज सुर्यवंशी ( तहसीलदार श्रीवर्धन )
-जयराज सुर्यवंशी ( तहसीलदार श्रीवर्धन )
मियावाकी पद्धतीने जंगल निर्मिती ही बाब माझ्या वाचनात आले होते त्या नुसार सदरच्या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे .श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्या नुसार उपक्रमात वृक्षांची निवड केली आहे .हा उपक्रम यशस्वी झाल्यास जैवविविधते साठी मैलाचा दगड ठरेल ....
-प्रवीण पवार (प्रांताधिकारी श्रीवर्धन )
-प्रवीण पवार (प्रांताधिकारी श्रीवर्धन )
आमच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या माध्यमातून आम्ही सदैव विविध समाज उपयोगी उपक्रमात सहभाग नोंदवतो .या उपक्रमात 120 श्री सदस्यांनी सहभाग घेतला आहे .वृक्षारोपण , स्वच्छता अभियान या उपक्रमात आम्ही नियमित सहभाग नोंदवला आहे .......श्री सदस्य ( नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्रीवर्धन )


Post a Comment