उद्धव ठाकरे यांचा हस्ते शिवसेना प्रणित गवळी समाजाच्याआरती पुस्तकाचे प्रकाशन


म्हसळा (बाबू शिर्के)
शिवसेना प्रणित यादव (गवळी) समाज संघटना श्रीवर्धन मतदारसंघ तर्फे गणपती बाप्पा आरती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न मा श्री उध्दवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून, सदरचा कार्यक्रमासाठी  सदानंद थरवळ संपर्क प्रमूख रायगड, अनिल नवगणे जिल्हा प्रमुख रायगड, संस्थापक  रविंद्र लाड, माजी सभापती म्हसळा, अध्यक्ष  गणेश वाजे, सचिव रुपेश दर्गे, खजिनदार  कृष्ण तटकरे, सर्व उपअध्यक्ष ,कार्यकारी अध्यक्ष, सल्लागार, सदस्य उपास्थित होते.यावेळी श्रीवर्धन म्हसळा, तळा, मांणगांव, रोहा, तालुक्यातील  गवळी समाज बांधवानी  पक्षप्रमुख  उध्दवजी ठाकरे यांना वचन दिले की  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात समाजाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करून भगवा झेंडा फडकवणारच तसेच आज पासून श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी  जिवाचे रान करणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी  उध्दवजी ठाकरे यांनी तुमची एक जूट पाहून मला खात्री आहे की आपण सर्व मिळून श्रीवर्धन मतदार संघात निश्चित विजय मिळवून देणार असे उपस्थितांना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा