तोंडसुरे ग्राम तंटामुक्त अध्यक्षपदी मल्लिकांत जंगम यांची फेरनिवड



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत तोंडसुरे येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत तोंडसुरे गावातील जंगमवाडीचे समाजसेवक श्री.मल्लिकांत अनंत जंगम यांची तोंडसुरे, बौद्धवाडी व जंगमवाडी असे तीन वाडीवस्ती मिळून ग्राम तंटामुक्त अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. मागील वर्षी त्यांनी संपुर्ण गाव तंटामुक्ती राखला आणि उत्कृष्ट काम पाहिल्याने याही वर्षी त्यांचे नाव अध्यक्ष म्हणुन पुढे आले आणि सर्वानुमते फेरनिवड झाली. तरुण, तडफदार, शांतता प्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले मल्लिकांत जंगम यांच्या अध्यक्ष निवडीसाठी जेष्ठ नागरिक विठोबा पवार यांनी ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यांच्या निवडीचे सरपंच स्मिता जंगम, उपसरपंच उमेश जंगम, गाव अध्यक्ष गोपाळ भायदे, माजी सरपंच मनोज नाक्ती, पवार गुरुजी, विठोबा पवार, अनिल जंगम, सुरेश महाडिक, मोरेश्वर जंगम, सुधाकर जंगम, तुकाराम महाडिक यांनी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मल्लिकांत जंगम यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा