सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई -खरसई तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न




नितीन पयेर : खरसई
दिनांक :- १५ ऑगस्ट २०१९ रोजी " सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई -खरसई “आयोजित शालेय गरजू विध्यार्थ्यांना वह्यावाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला , आणि ह्या कार्यक्रमाची सुरवात  रा. जि .प . मराठी शाळा खरसई  , न्यू इंग्लिश स्कुल खरसई , व  आजूबाजूंच्या गावात  शाळांत गरीब /गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाचा  तसेच हुशार व  गुणवंत विद्यार्थ्यांचा  "गुणगौरव सोहळा" कार्यक्रम पार पाडण्यात आला तसेच ह्या कार्यक्रमास खरसई  गावचे गाव अध्यक्ष मा .श्री पांडुरंग हरी खोत , शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री निलेश जी मांदाडकर साहेब गावचे  सरपंच श्री . इम्रान आकलेकर साहेब , श्री . अनंत भाई कांबळे साहेब , श्री. भानजी भुनेसार ( खरसई कोळी  समाज अध्यक्ष )  खरसई माजी अध्यक्ष  श्री. रामदास कांबळे साहेब , श्री . परशुराम मांदाडकर साहेब ,भालचंद्र म्हसकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री जनार्दन पयेर साहेब, जगदीश खोत,  ललित शितकर , श्री कानु बुवा शितकर, श्री. अमोल पाटील ( ग्राम प्रवर्तक ) , चिंतामणी वेटकोली , तसेच हायस्कूल चे मुख्याध्यापक मुलानी सर आणि शिक्षक वर्ग तसेच  मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री . दिनेश रांगळे सर , शिक्षक वर्ग ,उर्दू शाळा मुख्याध्यापक सोलकर जनाब ,व  खरसईतील  कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते मुख्यतः या कार्यक्रमास सोमजाईमाता क्रीडामंडळाचे संस्थाप्रमुख आदरणीय चंद्रकांत का .खोत ( भाऊ )  मंडळाचे , ज्येष्ठ कार्यकर्ते नथुरामजी खोत  साहेब , श्री नारायण लेपकर साहेब, श्री . नितीन पयेर ,पांडुरंग कांबळे, काशिनाथ शितकर  साहेब ,स्थानिक अध्यक्ष मा . श्री .  नरेशजी कातळकर ,स्थानिक माजीअध्यक्ष  मा.  श्री भालचंद्रजी  पयेर ,  श्री रमेश मेंदडकर ,श्री .दत्ताराम पयेर श्री यशवंत मेंदडकर श्री महादेव मांदारे , काशीनाथ कोकाटे श्री  बाळाराम पयेर साहेब आणि मंडळाचे  सभासद व  कार्यकर्ते उपस्थित होते

सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई -खरसई  ह्या संस्थेचे कार्य हे  कला , क्रीडा , सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक क्षेत्रात  अग्रेसर असे कार्य आहे,  ह्या संस्थेची विशेष बाब म्हणजे हि संस्था या वर्षी  ५०व्या  वर्षात अर्थातच  "सुवर्ण महोत्सव"  वर्षात पदार्पण केले आहे आणि या संस्थेचे कार्य  आजही अविरत निस्वार्थ भावनेने चालू आहे विशेषतः सोमजाईमाता क्रीडा मंडळाचे कार्य हे गावापुरतेच मर्यादित नसून रायगड , मुंबई , ठाणे  , पालघर  जिल्ह्यांमध्ये विविध समाजउपयोगी कार्य व शिबिरांचे आयोजन केले जाते


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा